इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तर देणारच- खासदार उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तर देणारच- खासदार उदयनराजे भोसले
सातारा ........

मराठा आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तर देणारच, अशी ग्वाही उदयनराजे यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली भूमिका मांडली.  
 सर्व समाजांप्रति आदर आहे. पण इतर समाजांप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.  मला कोणत्याही पक्षाचं लेबल लावू नका. माझी बांधिलकी लोकांशी आहे. वेळ पडली तर राजीनामा द्यावा लागला तर देणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
 आरक्षण प्रश्नी कोणीही श्रेय घेऊ नये. प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. न्याय नाही मिळाला तर उद्रेक होईल. जे मी बोलतो ते मी करतो. मनाला पटतं तेचं मी करतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मराठा समाजाला न्याय देण्यात काय अडचण? इतर समाजांना जसे आरक्षण दिले तसे मराठा समाजाला द्या. मराठ्यांना न्यायांपासून वंचित का ठेवता? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या