इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा खडका बंधारा १०० टक्के भरला !

 परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा  खडका बंधारा १०० टक्के भरला !



एक दरवाजा उघडला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

      परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा  खडका बंधारा १०० टक्के भरला आहे.तसेच या बंधार्याचा एक दरवाजा उघडला असुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा पुर्ण ओसंडून वाहत असल्याने परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.अखंडीत वीजनिर्मिती करण्याच्या दृष्टीने ही अतिशय समाधानाची बाब आहे.

       गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसाने परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करीत असलेला सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा १०० टक्के पूर्ण भरला. शुक्रवारी १० पैकी एक दरवाजा दुपारी एक तास उघडून पाणी सोडण्यात आले.  नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा भरल्याने या बंधार्याखालील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला याच ठिकाणाहून  पाणी पुरवठा होतो  त्यामुळे परळी वीज केंद्रासह सोनपेठ तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.


*Videoबातमी पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा👇👇👇*

https://youtu.be/n1ujwNm6eGM



.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या