परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो आयोजीत सेवा सप्ताहात , जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न; परळीत 70 जणांनी केले रक्तदान

 *पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो आयोजीत सेवा सप्ताहात  , जिल्ह्यात विविध कार्यक्रम संपन्न; परळीत 70 जणांनी केले रक्तदान



आजच्या कठीण काळात समाजोपयोगी उपक्रमांची गरज-निळकंठ चाटे*




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  

 देशाचे प्रभावी प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या वतिने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असुन या अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परळी शहरात आयोजीत रक्तदान शिबिरात 70 जणांनी रक्तदान केले. सध्या कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती असुन या काळात रक्तदान शिबिरासारख्या समाजोपयोगी कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची गरज असुन भाजयुमोच्या वतिने बीड जिल्ह्यात असेच सामाजीक उपक्रम राबविले जात असल्याचे भाजयुमो बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी सांगितले.



         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या वतीने दि.14 ते 20 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे.यात बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असुन परळी शहरातील अक्षता मंगल कार्यालयात आज शनिवार दि.19 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराच्या प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे तसेच पंडित दिनदयाल उपाध्यक्ष, लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. प्रतिमेचे पूजन 

ज्येष्ठ नेते भाजपाचे दत्ताप्पा ईटके, भाजपा प्रदेश चिटणीस  राजेश देशमुख, ज्येष्ठ नेते भिमराव मुडे, अल्पसंख्याक नेते करीम चाचा, श्रीहरी मुंडे, भाजपा तालुकाध्यक्ष सतिष मुंडे, डॉ. शालिनीताई कराड,  नगरसेवक प्रा.पवन मुंडे, राजेश गित्ते, प्रा.बिभीषण फड, रवि कांदे व भाजपाचे सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उद्घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरास कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले असुन वैद्यकिय सेवा करत असताना अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.समाजबांधवांना मदत करण्यासाठी भाजयुमोच्या वतिने या सेवा सप्ताहात अनेक उपक्रम राबविण्यात येत असुन सामाजिक उपक्रमासाठी सामाजिक संस्था,कार्यकर्त्यांनी हिरीरीने पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले.  

       यावेळी भाजपाचे राजेंद्र ओझा, सुरेश माने, उमेश खाडे, अरूण पाठक, संतोष सोळंके, नरसिंग सिरसाट, योगेश पांडकर,  किशोर केंद्रे, संजय मुंडे, महादेव ईटके, विकास हालगे, गणेश होळंबे, शिवराज मुंडे, सचिन गित्ते,अजय गित्ते, विजय तिडके, वैजनाथ रेकणे, समी शेख, शाम गित्ते, नितीन मुंडे, रवि चाटे, चैतन्य मुंडे, दिलीप नेहरकर, कष्णा मुंडे, बाळू फड, गोपी कांगणे,राजेश आघाव,  विजयकुमार खोसे, विशाल मुंडे, सुरेश सातभाई, अशिष कदरे, गोविंद चौरे, दिपक नागरगोजे, महादेव कराड, राम तोष्णीवाल, बंडू कांबळे,आप्पा पारेकर,  सतिष मुंडे इंदपवाडी, विठ्ठल कांदे, सुशील हरंगुळे वैजनाथ पवार तसेच भाजपाचे व भाजपायुमोचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष   निळंकठ चाटे यांच्या वतीने सर्व पदाधिकारी यांनी व

स्वामी रामानंद शासकीय रक्तपेढी अंबाजोगाईचे डॉ.अभिजीत वाघमारे, शशिकांत पारखे, किरण चव्हाण, शेख बाबा, रवी रोकडे आदींची परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरात  युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.रक्तपेढीत मुबलक साठा असल्याने इच्छा असूनही केवळ 70 युवकांनाच रक्तदान करताज आले.  पुढील काळात आवश्यकते प्रमाणे भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते रक्तदान करतील अशी माहिती जिल्हाध्यक्ष निळंकठ चाटे यांनी दिली आहे.


@@@@@@@

वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार


 माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!