इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-*पंकजाताई मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर हिवरा येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे* _रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी सुरू होते उपोषण_

 *पंकजाताई मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर हिवरा येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे*



_रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी सुरू होते उपोषण_ 


परळी । दिनांक २७ ।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मौजे हिवरा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज मागे घेतले.



परळी तालुक्यातील मौजे हिवरा ते पारगाव या गट नंबर १७ मधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी तेथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपासून सुरू केले होते. पंकजाताई मुंडे यांनी आज उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या ऐकून घेतली आणि महसूलच्या अधिका-यांना या प्रकरणात अतिक्रमण करणा-या विरुध्द  तात्काळ कारवाई करण्यास सूचित केले. उप विभागीय अधिकारी नम्रता चाटे व नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांच्या आश्वासनानंतर आणि पंकजाताई मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले.



   भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, हिवरा येथील भाजपा नेते वृक्षराज निर्मळ, बंडू निर्मळ, उपोषण कर्ते शेतकरी रघवीर रासवे, ज्ञानेश्वर म्हेत्रे, सुदाम रासवे, भगवान रासवे, तात्यासाहेब घोडके आदी यावेळी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या