इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-नागापुर येथील नागनाथ महाराज यात्रा महोत्सव रद्द

नागापुर  येथील नागनाथ महाराज यात्रा महोत्सव रद्द 



परळी l प्रतिनिधी

तालुक्यातील मौजे नागापूर येथे दरवर्षी साजरा होणारा नागनाथ यात्रा महोत्सव यंदा रद्द करण्यात आला आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे देवस्थान कमिटीच्या वतीने कळविण्यात आले आहे. तीन दिवस हा यात्रा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या तीन दिवसांत अनेक प्रकारच्या स्पर्धा आणि कार्यक्रम होत असतात.

नागापूर येथील नागनाथ महाराज यात्रा महोत्सव यंदा होणार नाहीये, यात्रे निमित्त दरवर्षी कुस्ती , पशुप्रदर्शन ,  विविध खेळ स्पर्धा व महाराज पालखी व श्री महाप्रसाद  इ कार्यक्रम होतात यावर्षी 24 ,25, 26 या तारखेला होती ती रद्द करण्यात आली आहे. नागनाथ देवस्थान कमिटीच्या वतीने विश्वस्थ बलासाहेब मिसाळ अध्यक्ष कुंडलिकराव सोळंके सेक्रेटरी, प्रभुआप्पा तोंडारे अर्जुनराव सोळंके, हणमंत कुलकर्णी यांनी माहिती दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट