MB NEWS-राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन! सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध!

 राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन!



सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध!

प्रतिनिधी(परळी)-

राज्यशासनाने मराठा समाजाच्या युवकांना डावलून पोलीस भरती व आरोग्य खात्याचे नोकरभरती सुरू केली असून याच्या निषेधार्थ बीड जिल्ह्याच्या परळी येथे मराठा क्रांती ठोक मोर्च्याचे राज्य समन्वयक अमित घाडगे व देवराव लुगडे, संतोष सोळंके, शिवराज जोगदंड,ओम काळे, अरुण सपाटे, निकेश पाटील व इतर उपस्थित होते. राज्यसरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन छत्रपती संभाजी चौकात करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

यावेळी सारकारच्या आडमुठ्या धोरणाबाबत उदासीनता दाखवीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

सरकारने याकडे गांभीर्याने नाही घेतले तर लवकरच आंदोलन करणार असल्याचा मराठा क्रांती ठोक मोर्च्याचे समन्वयक अमित घाडगे यांनी इशारा दिला आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार