इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS- *ओबीसींची जनगणना करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी* *मुंडे साहेबांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ केला ट्विट*

 *ओबीसींची जनगणना करा - पंकजाताई मुंडे यांची मागणी* 



*मुंडे साहेबांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ केला ट्विट*


मुंबई दि. २४ --- आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य असल्याचे ट्विट करत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे.


   आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. एक ट्विट करून त्यांनी ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सन 2010 मध्ये लोकसभेत केलेल्या भाषणाचा व्हिडीओ देखील त्यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीसोबत पंकजाताई मुंडे यांनी ‘आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा… ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य आहे’, अशी कॅप्शन लिहिली आहे. येणारी 2021 सालची जनगणना ही जातीनिहाय करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या