MB NEWS-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद परळीच्या कायदेविषयक सल्लागार पदीअॅड.आर.व्हि. गित्ते, अॅड.पी.एम.सातभाई तर वैद्यकीय विभाग प्रमुख पदी डॉ.राजाराम मुंडे*

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद परळीच्या कायदेविषयक सल्लागार पदीअॅड.आर.व्हि. गित्ते, अॅड.पी.एम.सातभाई तर वैद्यकीय विभाग प्रमुख पदी डॉ.राजाराम मुंडे*



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

     पत्रकार संघटनांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या परळी शाखेची नुतन कार्यकारीणी निवडण्यासाठी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सर्वानुमते नविन कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद परळीच्या कायदेविषयक सल्लागार पदी प्रसिद्ध विधिज्ञ अॅड.आर. व्हि. गित्ते, अॅड.पी.एम.सातभाई तर वैद्यकीय विभाग प्रमुख पदी प्रसिद्ध डॉ.राजाराम मुंडे यांची निवड करण्यात आली आहे.ही संपुर्ण निवड प्रक्रिया समन्वयक धनंजय आरबुने यांनी पार पाडली.

          परळीत आज दि.२४ रोजी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेची नविन कार्यकारीणी निवडण्यासाठी बैठक घेण्यात आली. संपादक सतिष बियाणी, संपादक राजेश साबणे, जेष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे, प्रशांत प्र.जोशी, संपादक आत्मलिंग शेटे, मोहन व्हावळे, ओमप्रकाश बुरांडे, प्रा.रविंद्र जोशी, प्रकाश चव्हाण,बालासाहेब फड, विश्वास महाराज पांडे, नरसिंग अन्नलदास आदी जेष्ठांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी झाल्या. नविन कार्यकारीणी पुढील प्रमाणे आहे. तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, शहराध्यक्ष जगदीश शिंदे, कार्याध्यक्ष अनंत कुलकर्णी, तालुका सचिव स्वानंद पाटील, शहर सचिव प्रा.प्रविण फुटके, तालुका उपाध्यक्ष मिलिंद चोपडे, दिगंबर देशमुख, कोषाध्यक्ष बालकिशन सोनी, संघटक श्रीराम लांडगे, सोशल मीडिया सेल महादेव शिंदे, संभाजी मुंडे, कायदेशिर सल्लागार ॲड.आर.व्ही.गित्ते, ॲड.पी.एम.साताई, वैद्यकीय कक्ष प्रमुख डॉ.राजाराम मुंडे यांची निवड करण्यात आली. नविन पदाधिकाऱ्यांचे अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्थ एस.एम.देशमुख, सरचिटणीस अनिल महाजन, जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर, विशाल साळुंखे व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या बैठकीस अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार