युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत महिला महाविद्यालयाचे घवघवीत यश, महाविद्यालयाचा संघ विभागीय स्तरासाठी पात्र

 जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत महिला महाविद्यालयाचे घवघवीत यश, महाविद्यालयाचा संघ विभागीय स्तरासाठी पात्र




परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)

          येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ट महाविद्यालयाच्या बुध्दीबळ संघाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून महाविद्यालयाचा संघ विभागीय स्तरासाठी पात्र ठरुन घवघवीत यश संपादन केले आहे.



                  येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ट महाविद्यालयाच्या बुध्दीबळ संघाने तालुकास्तरावर वयोगट (१९) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. संघातील विद्यार्थी प्रणिता देवधरे (प्रथम क्रमांक), अरशिया कच्ची (द्वितीय क्रमांक), मुस्कान शेख (द्वितीय क्रमांक) या जिल्हास्तरासाठी पात्र ठरल्या. जिल्हास्तरावरील बुध्दीबळ स्पर्धा शुक्रवारी (ता.२५) येथील पोद्दार राजस्थानी इंग्लिश स्कूल मध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्हा भरातून संघ सहभागी झाले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेत लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या संघाने घवघवीत यश संपादन करुन प्रथम क्रमांक पटकावला. 



  यामध्ये अरशिया कच्ची (प्रथम क्रमांक), मुस्कान शेख (द्वितीय क्रमांक), प्रणिता देवधरे (तृतीय क्रमांक) विद्यार्थिनींनी क्रिडा विभागप्रमुख प्रा.डॉ. प्रविण दिग्रसकर, संघ प्रमुख आशिलता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या