इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

तालुक्यात २२५ लाभार्थी ठरले पात्र

 खा.प्रितम मुंडे यांच्या हस्ते उद्या परळीतील दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे मोफत वितरण


पूर्व तपासणी शिबिरातील पात्र लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन !


परळी वैजनाथ । दिनांक १९  ।

तालुक्यातील दिव्यांगांसाठी खा.प्रितमताई मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याण मंत्रालय, तसेच गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून  दिव्यांग पूर्व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना निःशुल्क सहायक साधनांचे वितरण उद्या शुक्रवारी (ता. २०) करण्यात येणार आहे.  तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


दिव्यांगांना सहाय्यक ठरणारी उपकरणे निःशुल्क उपलब्ध व्हावीत,त्यांचे जीवन कष्टमुक्त व्हावे या हेतूने खा.प्रितमताई मुंडे यांनी केंद्र सरकार आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबविला होता. पूर्व तपासणी शिबिराअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना साहित्याचे मोफत वितरण करण्यासाठी खा.प्रितमताई सध्या  तालुकानिहाय कार्यक्रम घेत आहेत, याचाच एक भाग म्हणून परळी तालुक्यातील दिव्यांग बांधवांना उद्या शुक्रवारी सकाळी १० वा. उप जिल्हा रूग्णालयातील प्रांगणात साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  


तालुक्यात २२५ लाभार्थी ठरले पात्र

----------

तालुक्यात आयोजित केलेल्या पूर्व तपासणी शिबिरात एकूण २२५ लाभार्थी पात्र ठरले होते.  पात्र लाभार्थ्यांना व्हील चेअर, तीनचाकी सायकल, श्रवणयंत्र, कुबडी, सुगम छडी, कृत्रिम हाथ आणि पाय, स्मार्ट फोन, ब्रेल किट, रोलेटर असे विविध सहाय्यक उपकरण वितरित करण्यात येणार आहेत. दिव्यांगांना वितरित करावयाच्या सहायक साधनांमुळे त्यांचे जीवन कष्टमुक्त होण्यास मदत होणार आहे. वितरण सोहळ्यास दिव्यांग बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या