इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

मोटार सायकलला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यु

 मोटार सायकलला धडक : दोघांचा जागीच मृत्यू



केज दि. १९ - बोरी सावरगाव ते आंबेजोगाई दरम्यान अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना युसूफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.


केज तालुक्यातील दिपेवडगाव येथील रामप्रसाद भाऊसाहेब गुळभिले वय 37 वर्षे आणि वासुदेव अनंत देशपांडे वय 43 वर्षे हे दोघे बुधवारी (दि. १८) रात्री 11:30 च्या दरम्यान बोरी सावरगावहून आंबेजोगाईला निघालेले असताना त्यांची दुचाकी खटकळी पुला जवळ आली असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरील घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार श्री. बडे यांनी पुढील कार्यवाही करत त्यांना आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. आणि त्या ठिकाणी दोघांच्याही मृतदेहाचे शिवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. सदरील अपघात नेमका कसा घडला याची चौकशी एपीआय योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफ वडगाव पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या