इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

३९ लाखाच्या विटांचा व्यवहार: फसवणूक प्रकरणी परळी शहर पोलीसांनी हैदराबादेतून आरोपीला केलं अटक

 ३९ लाखाच्या विटांचा व्यवहार: फसवणूक प्रकरणी परळी शहर पोलीसांनी हैदराबादेतून आरोपीला केलं अटक



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......
      ३९ लाखाच्या विटांचा व्यवहार करुन  हैदराबादच्या एकाने परळीतील वीट उद्योग व्यापाऱ्याची  फसवणूक केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी परळी शहर पोलीसांनी हैदराबादेतून आरोपीला अटक केली आहे.
      परळीतील फिर्यादी शेख मकसूद मुजीब शेख रा. इस्लामपुरा बंगला परळी वै. यांच्याशी आरोपी खैसर अकबर पठाण रा. हैद्राबाद याने वीटा खरेदीचा व्यवहार केला.यातील आरोपीने फिर्यादीकडून 39,02,700/- रुपयांच्या विटा घेवुन गेला. त्यापैकी एकुण रक्कम रुपये 25,00,000/- (पंचवीस लाख रुपये) फिर्यादीच्या खात्यावर पाठवले. अजुन त्याच्याकडे बाकी 1402,700/- (चौदा लाख दोन हजार सातशे) रुपये असुन त्यापैकी  11,42,000/- चा चेक दिला मात्र तो चेक वटला नाही. तो खोटा व बनावट धनादेश देवुन एकुण 1404,700/- (चौदा लाख दोन हजार सातशे) रुपयांची फसवणुक करुन  विश्वासघात केला. असा तक्रार अर्ज दिल्याने अर्ज चौकशी वरुन आरोपीविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
      या प्रकरणात परळी शहर पोलीसांनी तपासाची सुत्रे हालवली. हैद्राबाद येथे जावुन आरोपीचा शोध घेतला.आरोपी खैसर अकबर पठाण रा. हैद्राबाद यास अटक केली.सपोनि ससाणे,भास्कर केंद्रे,गोविंद भताने,आदींनी ही कामगिरी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या