विशाल उत्तमराव देशमुख यांच्या हस्ते पूजा व आरती

 श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव  उत्साहात साजरा



विशाल उत्तमराव देशमुख यांच्या हस्ते पूजा व आरती 


परळी वैजनाथ/प्रतिनिधी

पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैजनाथ मंदिराच्या जवळ असलेल्या श्री बजरंग बली वेताळ मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रींची पूजा व आरती श्री बजरंग बली वेताळ मंदिराचे विश्वस्त विशाल उत्तमराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. 


हनुमान जयंतीनिमित्त श्री बजरंग बली वेताळ मंदिर  विद्युत रोषणाईने  व फुलांनी आकर्षक सजविण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ होती. महिलावर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित भाविकांचे स्वागत मंदिराचे महंत श्री विलासानंदजी महाराज यांनी केले.  श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरात फुलांची व रांगोळीची सुंदर व आकर्षक सजावट करून मंदिर सजविले होते. यावेळी श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त पूजा व आरती श्री बजरंग बली वेताळ मंदिराचे विश्वस्त विशाल उत्तमराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच उपस्थित भाविक भक्तांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.  दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार