इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

गेलीस काळजावर गोंदून माझे नाव

 गझलकार प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे लिखीत आणि प्रा.राहुलकुमार सोनवणे यांनी गायलेली गेलीस काळजावर गोंदून माझे नाव गझल आली रसिकांच्या भेटीला 


परळी प्रतिनिधी.    

   प्रसिद्ध गजलकार प्रा.डॉ. मुकुंद राजपंखे यांनी लिहलेली व प्रसिद्ध संगीतकार आणि गायक प्रा .डॉ. राहुलकुमार सोनवणे यांनी गायलेली गेलीस काळजावर गोंधळ माझे नाव ही गझल  नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे .हे गजल युट्युब वर रसिकांसाठी उपलब्ध झालेली आहे. या गझलेला रसिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

    मराठी गझल  "गेलीस काळजावर गोंदून नाव माझे " गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे यांनी लिहिलेली व गायक प्रा.राहुलकुमार सोनवणे यांनी गायलेली व संगीत संयोजन विशाल बोरुळकर यांनी केलेले आहे. या संगीतबद्ध केलेल्या गजलेवर सुंदर असे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे.त्यात अभिनय एस.ऋतुराज यांनी केलेला आहे. तसेच या गझलचे चित्रीकरण हर्ष फड , व्यंकटेश दौंड , वैभव बळवंत, अथर्व नागरगोजे , माऊली फड यांनी केलेले आहे तरी सर्व रसिक श्रोत्यांनी ही गझल MRJ PRODUCTION या यूट्युब चैनल वर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे गायक प्रा डॉ राहुलकुमार सोनवणे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या