दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

जानकरांच्या विजयासाठी सारेच सरसावले !

 महादेव जानकरांसाठी आज सीएम- डीएम व पीएम यांच्या परभणीत सभा : जानकरांच्या विजयासाठी सारेच सरसावले



परभणी: परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धारच महायुतीतील शीर्षस्थ नेत्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. ही जागा निवडून आणण्यासाठी थेट पंतप्रधानांपासून राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व प्रमुख स्टार प्रचारक असलेल्या धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्यासह नेतेमंडळी परभणी मतदार संघात प्रचार करून हा मतदारसंघ अक्षरशः पिंजूर काढताना दिसत आहेत. या अनुषंगानेच आज (दि.२३) महादेव जानकरांसाठी सीएम, डीएम व पीएम यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
         भारतीय जनता पार्टी महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रासपचे महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ वरिष्ठ नेत्यांनी धडाका लावला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित  पवार,पंकजा मुंडे यांनी जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही महादेव जानकर यांसाठी परभणी येथे सभा झाली. त्यानंतरही अनेक स्टार प्रचारक परभणी जिल्हा पिंजून काढत असून महादेव जानकर यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी चंग बांधल्याचे दिसून येत आहे. महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी आज दिनांक 23 रोजी परभणी मतदार संघात सीएम ,डीएम व पी एम च्या जाहीर सभा होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाथरी येथे महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे. त्याचबरोबर पाथरी येथे आयोजित मोटरसायकल रॅलीलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती लावणार आहेत. जिंतूर येथे भाजपाच्या स्टार प्रचारक राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची जाहीर सभा होणार आहे. तर सोनपेठ येथे राज्याचे कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
        एकंदरीतच महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते मंडळींनी परभणी मतदार संघ  पिंजून काढला असून सर्व शक्तीनिशी महायुतीचे प्रमुख घटक पक्ष हे महादेव जानकर यांच्या विजयासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत. त्यातही मुंडे परिवार व महादेव जानकर यांचे असलेले स्नेहसंबंध लक्षात घेता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी परभणी मतदार संघात स्वतः लक्ष घातले असून जानकर यांच्या विजयासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर भगिनी पंकजा मुंडे यांचे सुद्धा परभणी मतदार संघावर विशेष लक्ष आहे. आपले बंधू महादेव जानकर यांच्या विजयासाठी दोघेही मुंडे बंधू भगिनी आपल्या स्तरावरून सर्व शक्तीनिशी प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....