इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

आजपर्यंत एकूण दहा उमेदवारी अर्ज दाखल

 39 बीड लोकसभा मतदारसंघ निवडणूक चौथ्या दिवशी  ६ उमेदवारी अर्ज दाखल


तीन अपक्ष तर तीन पक्षाकडून अर्ज दाखल

आजपर्यंत एकूण दहा उमेदवारी अर्ज दाखल


बीड, दि.22 : (जिमाका)  39 बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आज चौथ्या दिवशी सहा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले.

 39  बीड लोकसभा मतदारसंघातून आज 3 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये शेख एजाज शेख उमर, भास्कर किसन शिंदे , तुकाराम विठोबा उगले

 तर तीन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून तीन अर्ज सादर करण्यात आले. दोन अर्ज बजरंग मनोहर सोनवणे यांचे आहेत तर एक सारिका बजरंग सोनवणे यांचा अर्ज आहे. या सर्व उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या समक्ष अर्ज सादर  केला.  


 सोमवारी 14 इच्छुक उमेदवारांना 26 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले.  आजपर्यंत एकूण 94 इच्छुक उमेदवारांना 211 नामनिर्देशन पत्राचे वाटप झाले.  39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी आजपर्यंत 10 उमेदवारी अर्ज  दाखल झाले आहेत.


39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दि. 18 एप्रिल 2024 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 25 एप्रिल 2024 ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 26 एप्रिल2024 रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 29 एप्रिल 2024 ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

 

सोमवार दि. 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत राहील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या