लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा


परळी वैजनाथ ता.२४ (बातमीदार)

         येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला  महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन हर्षोल्लासात साजरा करण्यात आला.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, डॉ एल एस मुंडे, डॉ विनोद जगतकर, डॉ पी व्ही गुट्टे, डॉ राजश्री कल्याणकर, प्रा प्रवीण फुटके आदि मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस केलेल्या माल्यार्पण करण्यात आले. या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ  विनोद जगतकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापने मागील उद्देश सांगून विद्यार्थ्यांत देशसेवा, देशभक्तीचे बीज पेरण्याचे व आदर्श सहकार्याची भावना तयार करण्याचे कार्य रा से यो कसे करते याचा सविस्तर आढावा घेतला. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार