कल्याणी....!!!. ...... पहा: सर्व काही वरील... पंकजाताई चा संपूर्ण पॉडकास्ट

इमेज
"राजकारणाने मला निवडले; बाबांचे जाणे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले" - पंकजाताई मुंडे  "मला कधीच राजकारणात यायचे नव्हते. माझी स्वतःची वेगळी स्वप्ने होती. बाबा असताना परिस्थिती अशी आली की एका दिवसांत सगळं बदललं आणि मी राजकारणात आले. मात्र ३ जून २०१४ रोजी घडलेल्या एका घटनेने माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, मी राजकारण निवडले नाही तर राजकारणानेच मला निवडले," अशी भावनिक प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजाते मुंडे यांनी एका विशेष मुलाखतीत व्यक्त केली.    दिवंगत नेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निधनानंतरच्या संघर्षाचा, राजकारणातील प्रवासाचा आणि वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांचा भावनिक प्रवास उलगडला. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ३ जून २०१४ हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही अत्यंत धक्कादायक ठरला. "त्या दिवशी बाबांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. आईने कार्यक्रमासाठी पैठणी तयार ठेवली होती, मीदेखील नवीन पोशाख काढून ...

परळी वैजनाथ: खामगाव येथील एका शेतकऱ्याची आत्महत्या

परळी वैजनाथ।प्रतिनिधी

         परळी तालुक्यातील खामगाव येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज(दि.३) सकाळी उघडकीस आली. प्रल्हाद अंकुश बडे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

         मागील काही वर्षांपासून त्यांना सततच्या नापिकी, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या चिंतेत ते नेहमीच असत असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसाळा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.दरम्यान प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या अर्थिक विवंचनेतून झाली असल्याचे बोलले जात आहे मात्र आत्महत्येचे कारण अधिक तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या