इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

तब्बल १० विद्यार्थी निवड: जिल्ह्यात एकमेव शाळा

विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांचे स्काउट्मध्ये घवघवीत यश 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालय ,नवीन शक्तीकुंज वसाहत, परळी वैजनाथ ता.परळी वैजनाथ जि.बीड या शाळेतील पाच  विद्यार्थी सुवर्णबाण व चार विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी शिबिरात सहभाग घेऊन यश मिळवले. जिल्ह्यात एकमेव ही शाळा आहे .महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स ,मुंबई तर्फे राज्य प्रशिक्षण केंद्र(स्काऊट), लातूर या ठिकाणी आमच्या विद्यावर्धिनी विद्यालयातील साने गुरुजी कब पथकातील सुवर्णबाण कब विद्यार्थी दिनांक 14 /2 /2024 ते 16 /2/ 2024 पर्यंत राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी शिबिरात सहभागी होऊन त्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांना सुवर्णबाण हा इयत्ता पहिली ते चौथी प्राथमिक विभागातील सर्वोच्च असा पुरस्कार आहे.

    तसेच दिनांक 03/03/2025 ते 05/03/2025 पर्यंत आमच्याच विद्यावर्धिनी विद्यालयातील साने गुरुजी कब पथकातील कब विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी शिबिर( कब विभाग ) याची परीक्षा राज्य प्रशिक्षण केंद्र (स्काऊट),लातूर या ठिकाणी तीन दिवस इयत्ता तिसरीतील चिमुकले कब विद्यार्थी आई-वडिलांपासून दूर राहून तीन दिवस विविध परीक्षा देऊन लेखी, मौखिक, प्रात्यक्षिक परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले आहेत या अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त ,नम्रता ,स्वच्छता, देशभक्ती , सामाजिक उपक्रमात सहभाग व एकमेकांना मदत करणे तसेच जीवनावश्यक ज्ञान, कला व कौशल्य या गुणांचे कब विद्यार्थी गुणाचा कबमध्ये विकास होतो .हा अभ्यासक्रम 27 महिन्यांचा असतो त्यानंतर त्यांना राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी शिबिरात सहभागी होता येते . हे चाचणी शिबिर तीन दिवस राज्य प्रशिक्षण केंद्र स्काऊट या ठिकाणी मुक्कामी राहून परिक्षा द्यावी लागते.त्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर त्यांना सुवर्णबाण हा पुरस्कार मिळतो हा अभ्यासक्रम इयत्ता पहिलीपासून शिकवला जातो राज्यस्तरीय चतुर्थ चरण शिबिरात सहभागी होण्यासाठी दोन प्राविण्यपदक फाईल बनवावी लागते सुवर्ण बाण होण्यासाठी एकूण सहा प्राविण्यपदकांचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांच्या फाईल बनवावी लागते. राष्ट्रीय कार्यालय स्काऊट, दिल्ली येथून हा निकाल प्राप्त होतो हा सर्वोच्च पदक मानले जाते इयत्ता पहिली ते चौथी मधील सर्वात मोठा मान जिल्ह्यात हा आमच्या एकमेव विद्यावर्धिनी विद्यालयातील  नऊ विद्यार्थ्यांनी मिळवलाआमच्या शाळेसाठी खूप मोठा अभिमान आहे .राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी शिबिरात सहभागी कब दिनांक :03/03/ 2025 ते 05/03/2025 पर्यंत राज्य प्रशिक्षण केंद्र (स्काऊट),लातूर या ठिकाणी चाचणी शिबिरात सहभागी कब खालील प्रमाणे आहेत.1)कार्तिक राजेंद्र सुरवसे 4थी 2) सर्वेश सचिनराव येवतेकर 4थी 3) प्रणव अंकुशराव वांकर 4थी 4)मयुरेश पवनकुमार भुजंगे 4थी तसेच सून2025 .26शैक्षणिक वर्षात सुवर्ण बाण झालेले सानेगुरुजी कब पथकातील कब खालील प्रमाणे आहेत 1)कृष्णा ज्ञानेश्वर कांबळे 5वी 2)संघर्ष दीपक घाडगे 5वी 3)प्रणव प्रकाश भालेराव 5वी  4)आर्यन व्यंकटी काचगुंडे 5वी 5)ओमकार प्रशांत कदम 5 वी वरील सर्व साने गुरुजी कब पथकातील कब विद्यार्थ्यांचे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, परळी वैजनाथ संचलित चे अध्यक्ष श्री कोळगे एस .एस .उपाध्यक्ष श्री भिंगोरे एस. बी. सचिव श्री ईटके पी.जी .संचालक श्री पैंजणे पी .जे .श्री मुंडे एम .टी . श्री.देशपांडे व्हि.डी.श्री.वाणी आर.पी.डॉ.चेवले बी . ए .श्रीमती अभंग मॅडम श्री मातेकर यु. एच. श्री कराड एस. एम .विद्यावर्धिनी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री निला आर .जी .विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुमठाणे जे. व्ही. विवेकवर्धिनी प्राथमिक विद्यालय शारदानगर,परळी वैजनाथचे मुख्याध्यापक श्री नांदूरकर आर. आर . मार्गदर्शक स्काऊट/कब मास्टर श्री .सूर्यवंशी पंडित विश्वनाथ व शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वरील सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या