प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 अवैध विक्रीला प्रतिबंध :परळी शहर पोलिसांची  गुटखा  कारवाई 



परळी (प्रतिनिधी)

 परळी शहर पोलिसांनी मागील काही दिवसांमध्ये आपल्या हद्दीत गुटखा विक्री करणारे,मटका व इतर जुगार अड्ड्यावर कारवाई करत अनेकांविरुध्द गुन्हा दाखल करुन कारवाई सुरु केली आहे.शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा विक्रीची साखळी तोडण्याचा प्रयत्न पोलिस करतांना दिसत आहेत.

  परळी शहरात गुटखा विक्री, सर्रासपणे सुरु होती.परळी शहर पोलिस ठाण्याचे पो.नि.रघुनाथ नाचन यांनी याबाबत कठोर भुमिका घेत हद्दीमध्ये सुरू असलेल्या छोट्या,मोठ्या गुटखा विक्रेत्याविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.कारवाई दरम्यान मांडवली करण्यासाठी आलेल्यांना कुठलाही थारा न देता या कारवाया केल्या जात असल्याने गुटखा विक्रीची मजबुत चैन उध्वस्त होत आहे.तीन दिवसांपुर्वी दुचाकीवरुन विक्रीसाठी नेण्यात येणारा ४६ हजार रुपयांचा गुटखा पकडुन तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीसांनी गुटखाविक्री विरोधात कारवाई केल्यानै गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत आहे.शहर पोलिसांची कारवाई या धंद्यामध्ये प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष गुंतलेल्यांच्या जिव्हारी लागत असली तरी या कारवाईचे सर्वसामान्य जनतेतुन कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या