इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

महिला महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे १००% सुयश 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

        येथील कै लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची  विजयी परंपरा अखंड चालू असते.मार्च / एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षेत महाविद्यालयाच्या कॉमर्स - वाणिज्य विभागाने यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे  .

    वाणिज्य विभागातील सर्वच्या सर्व विद्यार्थिनी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या . या विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून या विभागांतील तृतीय वर्षातील कु . फुलारी वैष्णवी किशोर , कु.ढाकणे प्रतीक्षा गोविंद व कु .बालटे वैष्णवी व्यंकटी या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला . या विद्यार्थिनी व कु . बन्साळी सिया सुरज  ही विद्यार्थिनी पुणे येथे सीए फाउंडेशन कोर्स करीत आहेत . 

    या उतुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख सचिव रवींद्र देशमुख कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख यांनी संपूर्ण वाणिज्य विभागाचे व  विद्यार्थिनींचे मनस्वी अभिनंदन केले असून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांनी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या या वाणिज्य विभागाच्या या यशामागे महाविद्यालयातील श्री एन जी फुलारी सर यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या