इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

न.प.प्रशासनाला काँग्रेसने दिले 15 दिवसाचे अल्टिमेटम

परळी न.पच्या अंतर्गत झालेल्या कामांची इ.स.2016 ते 25 वर्षातील श्वेतपत्रिका त्वरित जाहीर करा-बहादुरभाई

शहरातील  विविध प्रश्नांवर परळी काँग्रेसचे निवेदन

 परळी वैजनाथ , प्रतिनिधी..

झोपेचे सोंग घेऊन परळी नगर परिषद प्रशासन मुग गिळून करोडो रुपयांचा अफरातफर करत गिळंक्रत करत आहे याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाच्या वतिने वारंवार श्वेतपत्रिका काढावी म्हणून निवेदने, आंदोलने केले परंतु अद्यापही श्वेतपत्रिका काढु शकली नाही यामुळे भ्रष्टाचाराचा संशय अधिक बळावला आहे.याच निवेदनाची पुन्हा आठवण म्हणून काँग्रेसच्या वतीने परळी नगर परिषदेला देण्यात आले असल्याचे शहराध्यक्ष बहादुरभाई यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान शुक्रवार दि.27 जुन रोजी परळी नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, न.प.प्रशासनाने 2016 से 2024 पर्यतची श्वेतपत्रिका आठ दिवसात प्रसिद्ध करावी, मागील दोन तीन वर्षा पासून आमच्या  काँग्रेस पक्षा मार्फत अनेक निवेदन आपणास देण्यात आली जसे की, दुबार टेंडर ची चौकशी, झालेले कामाचे निवेदा काडून कोट्यावधी चे भ्रष्टचार बाबत चौकशी, कामाची गुणवत्ता बाबत, श्वेत पत्रिका प्रसिद्ध करणे बाबत, मनमानी कर मागे घेण्या बाबत, रोड, रास्ते, नाल्या, स्वच्छता, घरकूल, बाबत अनेक निवेदन देऊन सुद्धा एक ही कार्यवाही आपले कार्यालय मार्फत आज पर्यत पर्यंत केली नाही, किंवा त्या बाबत काही कारवाई दिसून येत नाही. डिसेंबर 2016 ते मार्च 2025 पर्यंतहची श्वेतपत्रिका दि.5 जुन 2025 पूर्वीची प्रसिद्ध करावी, पक्षाचे अनेक निवेदन आपल्या कार्यालयात पडून आहे त्यावर कार्यवाही करावी अन्यथा आपण भ्रष्टचाराचे पाठराखण करीत असल्याने आपल्या भूमिकेचे परळी शहर काँग्रेस च्या वतीने दि.दि.5 जुन 2025 नंतर तिव्र आंदोलन आपल्या कार्यलय समोर करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.तसेच परळी शहरातील सरस्वती नदीवरील, अतिक्रमण तत्काळ हटवणे, मुस्लिम कबरस्थान जवळील आपण केलेले नाला चे नालीत रूपांतर पुन नाल्यात करणे, शादी खाना ते सरस्वती नदी दरम्यान असलेली घाण तत्काळ काढणे व शादीखाना परिसरातील अतिक्रमण ताबडतोब हटवणे अदी बाबत निवेदन देण्यात आले याच बरोबर आहे.न.प.प्रशासनाला काँग्रेसने 15 दिवसाचे अल्टिमेटम देत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर शशी चौधरी,इतेशाम खातिब,वैजनाथ गडेकर,दीपक सिरसाट,रुसुल खान, बद्दर भाई, गफारशा, गित्ते इत्यादीच्या स्वाक्षरी आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या