इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

क्लासेस संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावून करायचे विनयभंग

विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षक व क्लासेस चालकाच्या विरोधात गुन्हा 

क्लासेस संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावून करायचे विनयभंग 


बीड,प्रतिनिधी : बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये असलेल्या क्लासेसचे संचालक व शिक्षक अशा दोघांवर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्राध्यापक विजय पवार व  प्रशांत खटावकर असे या शिक्षकांची नावे आहेत. पिढीत विद्यार्थिनी 30 जुलै 2024 पासून या क्लासेसमध्ये शिक्षण घेते. क्लासेस संपल्यानंतर प्रशांत खटावकर व विजय पवार हे या  विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावत तिचा विनयभंग करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जवळपास वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे करत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना केले असल्याची माहिती लांडगे यांनी दिली. दरम्यान बीडच्या शैक्षणिक वर्तुळात मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या