मोहा येथील घटनेने बीडमध्ये हळहळ

इमेज
  बांधकामावरून पडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू बीड प्रतिनिधी —        मोहा ता. परळी येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून खाली पडल्याने एका २८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमोल विलास माने (वय २८, रा. गोविंद नगर, धानोरा रोड, बीड) असे मृत युवकाचे नाव आहे.या दुर्दैवी घटनेची सिरसाळा पोलीस ठाण्यात  बीएनएसएसच्या कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्युची नोंद करण्यात आली असुन पोलीस हवालदार विष्णु नामदेव शेंडगे अधिक तपास करत आहेत .     याबाबत मयताची आई निर्मला विलास माने यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास कंत्राटदार मुस्ताक कादरी व कामगार अक्षय गायकवाड आणि शेख अजीन हे त्यांच्या घरी आले. त्यांनी अमोल हा मोहा येथील बांधकाम साईटवर काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली पडल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने शासकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र नंतर नाते...

प्रशासनाची कडक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

महापुरुषांच्या विचाराला साजेशी जयंती साजरी करा- उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे




परळीमध्ये आंबेडकर जयंती शांततेत साजरी करण्याचे आवाहन; प्रशासनाची कडक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

परळी, (प्रतिनिधी):-भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त परळी शहरात व तालुक्यात महापुरुषांच्या विचाराला साजेशी जयंती साजरी व्हावी, शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखत उत्सव साजरा व्हावा यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.

      या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांनी मार्गदर्शन करताना उपस्थितांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन आपल्या सोबत कटिबद्ध आहे. मात्र नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. समित्यांनी जबाबदार स्वयंसेवक नेमून त्यांना ओळखपत्र द्यावे. मिरवणुकांमध्ये महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असल्याने शिस्त पाळणे गरजेचे आहे. मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.तसेच त्यांनी डीजे संदर्भातही कडक इशारा देत सांगितले की, जिल्ह्यात डॉल्बी साऊंड सिस्टमवर बंदी आहे. आवाजाची मर्यादा ८० डेसिबल ठेवणे बंधनकारक आहे. मर्यादा ओलांडल्यास गुन्हे दाखल करून साहित्य जप्त करण्यात येईल. पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

    उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपण ज्या महापुरुषांची जयंती साजरी करतो, ते भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार आणि आचरण हेच जयंतीचे खरे उद्दिष्ट आहे. परळीतील नागरिकांनी नेहमीच शांततेत आणि उत्साहात सण साजरे केले आहेत. यंदाही ती परंपरा कायम राहील असा विश्वास आहे.त्यांनी पुढे सांगितले की, पोलीस प्रशासन सर्वत्र पोहोचू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक समितीने स्वतःचे स्वयंसेवक तयार करून शिस्त राखण्यास मदत करावी. विविध जाती-धर्मातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. ही भारताची परंपरा असून ती जपणे आवश्यक आहे.बैठकीत पोलीस पाटील भरती प्रक्रियेबाबतही माहिती देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया गतीमान करण्यात आली असून बहुतांश पदे भरण्यात आली आहेत. लवकरच नियुक्त उमेदवारांना आदेश व ओळखपत्र देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

     या बैठकीस उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे, नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी, पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मझहरअली, परळी न.प.चे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टावार, वीज विभागाचे अधिकारी, विविध गावांचे पोलीस पाटील, भीम जयंती महोत्सवाचे अध्यक्ष पदाधिकारी, पत्रकार, विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीचे प्रस्ताविक पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी केले, तर सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टावार यांनी केले. उपस्थित नागरिकांनीही प्रशासनाला विविध सूचना मांडत सहकार्याचे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या