भावपूर्ण श्रद्धांजली........!!!!
शिक्षक विद्यार्थी पालकांमध्ये योग्य समन्वय असल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी निर्माण होतात - प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे
परळी वैजनाथ दि.०७ (प्रतिनिधी)
शिक्षक विद्यार्थी पालकांमध्ये योग्य समन्वय असल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी निर्माण होतात असे प्रतिपादन प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांनी लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित पालक मेळाव्यात बोलताना केले. तर पालकांनीही विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले पाहिजे असे मत संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख यांनी व्यक्त केले.
येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी (दि.०७) सकाळी ११ वाजता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पालक मेळाव्याच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्यामराव देशमुख, माता सरस्वती व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, श्रीमती टकले, श्री ठाकुर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना प्राचार्या डॉ विद्या देशपांडे म्हणाल्या की, आमच्या महाविद्यालयात अभ्यासक्रमा बरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. तसेच विद्यार्थिनी संस्कारक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात. यासाठी पालकांच्या सहकार्याची गरज आहे. तर अध्यक्षीय समारोपात संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख यांनी सांगितले की, महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वंकष विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.आम्ही विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवतो पण पालकांनीही विद्यार्थ्यांकडे लक्ष ठेवून अभ्यासाचा पाठपुरावा केला पाहिजे. तर विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढेल. यावेळी प्राध्यापांसह पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रविण फुटके, सूत्रसंचालन प्रा प्रविण नव्हाडे तर आभार प्रा आशिलता शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा विशाल पौळ, प्रा अशोक पवार, प्रा डॉ विना भांगेसह वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा