भावपूर्ण श्रद्धांजली........!!!!

इमेज
गोविंद (भैय्या)चांडक यांना आजीशोक; फुलाबाई काकाणी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      येथील सर्वपरिचित व्यावसायिक गोविंद (भैय्या) चांडक यांच्या आजी श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी यांचे दि.६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.      श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी या अतिशय कुटुंबवत्सल, धार्मिक, संयमी व धीरोदात्त स्वभावाच्या होत्या. वयाची शंभरी पार करत त्यांनी जीवनभरात लेक, नातू, नातसूना पणतू अशा पारिवारिक नात्यांना भरभरून माया दिली. चांडक परिवारासाठी एक आधारवड अशी कौटुंबीक भूमिका त्यांनी अगदी लीलया पार पाडत एक आदर्श निर्माण केला. वयोमानापरत्वे त्यांनी शतकी आयुष्यात इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथील मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन नातू, तीन नाती,नातसूना, पतवंडे असा मोठा परिवार आहे.श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी यांच्या निधनाने चांडक कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

उमापूर व बडेवाडी दोन्ही गावातील नारळी सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने होणार सांगता, धनंजय मुंडे उपस्थित राहणार

श्री क्षेत्र नारायणगड व श्री क्षेत्र भगवान गडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगतेस आ. धनंजय मुंडे राहणार उपस्थित



उमापूर व बडेवाडी दोन्ही गावातील नारळी सप्ताहाची आज काल्याच्या कीर्तनाने होणार सांगता, धनंजय मुंडे उपस्थित राहणार

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - श्री क्षेत्र नारायण गड व श्रीक्षेत्र भगवानगड या दोन्हीही आध्यात्मिक गडांच्या नारळी सप्ताहाची आज (ता. ०७) एकाच दिवशी सांगता होणार असून या दोन्ही सप्ताहांना माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत.  

श्री क्षेत्र नारायण गडाचा पारंपरिक नारळी सप्ताह हा गेवराई तालुक्यातील उमापूर येथे संपन्न होत असून धनंजय मुंडे हे आधी उमापूर येथील या सप्ताहास भेट देऊन श्रीनगर नारायण महाराजांचे व गडाचे महंत प्रेममूर्ती ह. भ. प. श्री शिवाजी महाराज यांचे दर्शन व आशीर्वाद घेतील. 

श्रीक्षेत्र भगवानगडाचा पारंपारिक नारळी सप्ताह हा पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी गावात संपन्न होत असून उमापूर नंतर धनंजय मुंडे हे बडेवाडी येथील सप्ताहात भेट देऊन ऐश्वर्या संपन्न संत भगवान बाबा व गडाचे महंत न्यायाचार्य ह. भ. प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांचे दर्शन व आशीर्वाद घेतील. 

श्री क्षेत्र नारायण गड व श्रीक्षेत्र भगवानगड या दोन्ही गडांना अखंड हरिनाम फिरत्या नारळी सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा असून माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील अनेक वर्षांपासून या दोन्ही सप्ताहाच्या सांगता समारंभात उपस्थित राहत आले आहेत. मागील वर्षी मुंबई येथून येताना हेलिकॉप्टर उड्डाणास वेळेवर परवानगी न मिळाल्याने ही परंपरा एकवेळा खंडित झाली मात्र यावर्षी पुन्हा धनंजय मुंडे हे दोन्ही नारळी सप्ताह स्थळी दर्शनासाठी येणार असून, या आध्यात्मिक व्यासपीठावरून ते बोलतील का? काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!