पोलीस उपनिरीक्षक राजाराम शेळके यांच्या सेवा निवृत्ती सोहळ्यात पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व प्रा. रवींद्र जोशी यांचे गौरवोद्गार

पो.उपनि. राजाराम शेळके यांनी नेहमी कर्तव्याला प्राधान्य दिले– पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे

३६ वर्षे निष्कलंक सेवा हीच राजाराम शेळके यांची खरी ओळख- पत्रकार प्रा. रविंद जोशी


पोलीस उपनिरीक्षक राजाराम शेळके यांच्या सेवा निवृत्ती सोहळ्यात पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व प्रा. रवींद्र जोशी यांचे गौरवोद्गार

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी):-पोलीस दलातील सेवा ही २४ तासांची असते. अशा कठीण आणि तणावपूर्ण सेवेत राजाराम शेळके यांनी प्रत्येक जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. वैद्यनाथ मंदिर पोलीस चौकीत कार्यरत असताना देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची आणि दर्शन व्यवस्थेची त्यांनी उत्कृष्ट जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कामाबाबत माझ्याकडे कधीही एकही तक्रार आली नाही. त्यांनी केलेले प्रत्येक काम परिपूर्ण आणि विश्वासार्ह होते.असे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी काढले. तर आपल्या "३६ वर्षांच्या सेवाकाळात एकही शिस्तभंगाची कारवाई न होणे हीच राजेभाऊ शेळके यांच्या चारित्र्याची आणि कर्तव्यनिष्ठेची सर्वात मोठी पावती आहे. उलट उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना सुमारे २८ वेळा पोलीस दलाकडून गौरविण्यात आले असल्याचे पत्रकार रवींद्र जोशी यावेळी म्हणाले. 

        यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टावार, मा. पोलीस उपनिरीक्षक व्यंकट भताने, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, संगम तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापूराव नागरगोजे, संगमचे उपसरपंच नागरगोजे, प्रल्हाद मुंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजाराम (राजेभाऊ) शेळके यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

   सेवानिवृत्ती सोहळ्यात बोलताना संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्याच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचा मोठा त्याग असतो. शेळके यांच्या पत्नीनेही संपूर्ण सेवाकाळात घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. आता सेवानिवृत्तीनंतर त्यांना कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येईल. त्यांचे पुढील आयुष्य निरोगी, सुखी आणि समाधानाचे जावो अशी प्रार्थना त्यांनी प्रभू वैद्यनाथ चरणी शुभेच्छा देताना केली. तर पत्रकार रवींद्र जोशी यांनी राजाराम उर्फ राजेभाऊ शेळके यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना आपल्या "३६ वर्षांच्या सेवाकाळात एकही शिस्तभंगाची कारवाई न होणे हीच राजेभाऊ शेळके यांच्या चारित्र्याची आणि कर्तव्यनिष्ठेची सर्वात मोठी पावती आहे. उलट उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना सुमारे २८ वेळा पोलीस दलाकडून गौरविण्यात आले. पत्रकार म्हणून अनेक पोलीस अधिकाऱ्यांसोबत काम करण्याचा अनुभव आहे. मात्र राजेभाऊ शेळके यांच्यासारखा संवेदनशील, लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा आणि गुन्हेगारांपर्यंत अचूक पोहोचणारा अधिकारी विरळच. त्यांच्या संपर्क जाळ्यामुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासाला दिशा मिळाली. ते उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून राज्य व राष्ट्रीय स्तरावर झळकले आणि त्याच क्रीडा गुणवत्तेच्या जोरावर पोलीस दलात दाखल झाले. सेवेच्या अखेरच्या टप्प्यात वैद्यनाथ मंदिराच्या सेवेत राहण्याचे भाग्य लाभणे, ही त्यांच्या आयुष्यातील मोठी जमेची बाजू आहे. असेही पत्रकार रवींद्र जोशी यावेळी म्हणाले. उपस्थितांनी ही टाळ्यांच्या कडकडाटात राजाराम (राजेभाऊ) शेळके यांच्या निष्कलंक सेवेला सलाम करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

     पोलीस उपनिरीक्षक राजाराम (राजेभाऊ) शेळके यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात त्यांच्या ३६ वर्षांच्या प्रामाणिक, शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख सेवेला मान्यवरांनी मानवंदना दिली. यावेळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे आणि ज्येष्ठ पत्रकार तथा प्रा. रवींद्र जोशी यांनी आपल्या भाषणातून राजेभाऊ शेळके यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.

     सेवा निवृत्ती कार्यक्रम सोहळ्यास पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय आरबुने यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...