स्व.अजितदादा पवार जयंती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. धनंजय मुंडे व ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त
परळी वैजनाथ नगर परिषदेच्या वतीने १५ ते २९ जुलैदरम्यान लोककल्याणकारी सेवा पंधरवडा-- नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी

परळी वैजनाथ | प्रतिनिधी
      नगर परिषद परळी वैजनाथच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त १५ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत ‘लोककल्याणकारी सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांसाठी विविध सामाजिक, आरोग्य, पर्यावरण व जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली आहे.
      या लोककल्याणकारी सेवा पंधरवड्याची सुरुवात १५ जुलै रोजी होणार आहे. यानिमित्ताने शासकीय- निमशासकीय कार्यालये याठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून याचा शुभारंभ वैद्यनाथ मंदिर येथून होणार आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना २.० मधील लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी वितरण होणार आहे.१६ जुलै रोजी एसआयआर योजनेसाठी मदत केंद्रांच्या माध्यमातून सेल्फी पॉइंट व मोफत पासपोर्ट फोटो अभियान, १७ जुलै रोजी ट्री गार्ड दत्तक मोहीम, १८ जुलै रोजी डॉ. भालचंद्र वाचनालय ग्रंथदान अभियान शुभारंभ, १९ जुलै रोजी शासकीय निमशासकीय कार्यालयात जलपुनर्भरण अभियान शुभारंभ, तर २० जुलै रोजी नगर परिषद अधिकारी, कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे.
  त्याचबरोबर २१ जुलै रोजी भिंती चित्रे सुशोभीकरण अभियान, २२ जुलै रोजी नगर परिषद मुख्यालयात स्व . अजितदादा पवार स्मृती वैद्यकीय सहायता कक्ष शुभारंभ, २३ जुलै रोजी वैद्यनाथ मंदिर प्रदक्षिणा मार्गाव र२.५ लक्ष वृक्ष संवर्धन मोहीम शुभारंभ, २४ जुलै रोजी प्लास्टिकमुक्ती अभियान व कापडी पिशवी वितरण, २५ जुलै रोजी पाणी गळती शोध मोहीम, २६ जुलै रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे महिला मेळावा, महिला बचत गट व फेरीवाल्यांना कर्ज वाटप २७ जुलै रोजी शाळा - महाविद्यालयांच्या सहभागाने पोलिस ठाण्यासमोरून व्यसनमुक्ती जनजागृती रॅली, २८ जुलै रोजी ई-कचरा संकलन गाडीचा शुभारंभ आणि २९ जुलै रोजी पी-१ व पी-२ पार्किंग व्यवस्थापन फलकांचे अनावरण आदी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 
     या लोककल्याणकारी सेवा पंधरवड्यात आयोजित सर्व उपक्रमात शहरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, युवक- युवती, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, उपनगराध्यक्षा खैसर राजा खान पठाण, मुख्याधिकारी पी. एस. निगळ, सर्व सभापती, यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका नगर परिषद परळी वैजनाथ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...