परळी रेल्वे विकास समितीने दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक संजयकुमार श्रीवास्तव यांची घेतली भेट
दक्षिण मध्य रेल्वेच्या खासदारांच्या बैठकीत रेल्वेसंबंधी मागण्यांचे दिले निवेदन
परळी वैजनाथ( प्रतिनिधी): दक्षिण मध्य रेल्वेची सुमारे दोन वर्षांनंतर नांदेड विभागातील खासदारांची मुख्य व्यवस्थापकांसमवेत बैठक नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती.
परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक संजयकुमार श्रीवास्तव यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण,खासदार डॉ.अजित गोपछडे,परभणीचे खासदार बंडू जाधन यांना भेटून निवेदन सादर केले.
दक्षिण मध्य रेल्वेच्या महसूल देणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा समावेश असूनही दक्षिण मध्य रेल्वे दुजाभाव करूनअपेक्षित सुविधा उपलब्ध नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये परळी वैजनाथ जंक्शनचे मध्य रेल्वेमध्ये हस्तांतरण, स्थानकावर पिट लाईन मंजूर करणे आणि ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पर्यटक माहिती केंद्र उभारणे यांचा समावेश आहे.
याशिवाय मुंबई-लातूर एक्सप्रेस,मछलीपट्टणम-बिदर एक्सप्रेस आणि हैदराबाद-बिदर इंटरसिटी या रेल्वेगाड्यांचा परळी/ नांदेडपर्यंत विस्तार करण्याची मागणी करण्यातआलीआहे. चार ज्योतिर्लिंगांना जोडणारी ‘ज्योतिर्लिंग एक्सप्रेस’ सुरू करण्याबरोबरच सिकंदराबाद-जम्मू तवी, कन्याकुमारी- उधमपूर, रामेश्वरम- ओखा आणि हैदराबाद- अजमेर या नव्या रेल्वे सेवा परळी मार्गे चालविण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. परळी वैजनाथ मार्गे पुणे, मुंबई आणि हैदराबाद यांना जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, तसेच कोल्हापूर- धनबाद आणि कोल्हापूर- नागपूर या रेल्वेगाड्या दररोज धावाव्यात,अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर जलालपूर परिसरात नवीन रेल्वे उड्डाणपूल उभारावा,अशी मागणी करण्यात आली आहे. मानवत-पाथरी-सोनपेठ-परळी आणि घाटनांदूर-अंबाजोगाई-जा मखेड-दौंड या महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पांसाठी तसेच घाटनांदूर येथे लुटमार व चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत त्यांना आळा बसण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांची घाटनांदूर येथे आऊटपोस्टसाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची मागणीही निवेदनात केली आहे.यावेळी परळी रेल्वे विकास समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक जी.एस.सौंदळे सर,मुख्य समन्वयक कैलास तांदळे,श्रीकांत पाथरकर, मुकेश भूतडा आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा