संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्याची परळी संपादक संघाची मागणी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)ः-दै.जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी परळी संपादक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

 या संदर्भात परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांच्या मार्फत पोलीस महानिरिक्षक छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र) यांना आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनिक जगमित्र ह्या दैनिकाचे संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावर राज्य वक्फ बोर्डचे अध्यक्ष समिर काझी यांच्या सहाय्याकाने गुन्हा दाखल केला आहे. दैनिक जगमित्र चे संपादक बालासाहेब कडबाने यांनी आपल्या दैनिकातून सत्य व पारदर्शक बातम्या प्रसिद्ध करुन लोकांसमोर व प्रशासना समोर सत्य मांडले आहे. काही दिवसापुर्वी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समिर काझी यांच्या भ्रष्टाचारी कारभाराबद्दल दैनिक जगमित्र दैनिकात वृत्त छापले परंतु लोकांसमोर व प्रशासना समोर पोलखोल झाल्याने या रागातून समिर काझी यांनी त्यांचे सहाय्यकाच्या मार्फत तक्रार देऊन दैनिक जगमित्र चे संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  

     हा प्रकार लोकशाहीची मुस्कटदाबी करणारा आहे. आम्ही संपादक बांधव असे प्रकार व खोटे गुन्हे खपवून घेणार नाहीत. संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावरील खोट्या गुन्ह्याचा आम्ही जाहिर निषेध करत आहेत. तरी सदर गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी दै.वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड, दै.महाराष्ट्र प्रतिमाचे संपादक ज्ञानोबा सुरवसे, दै.परळी प्रहारचे संपादक राजेश साबणे, दै.न्याय टाईम्सचे संपादक बालकिशान सोनी, क्रांती संघर्षचे संपादक शिवशंकर झाडे, परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे, संघर्ष नेताचे संपादक मोहन व्हावळे, बातमीदारचे संपादक महादेव गित्ते, मराठवाडा साथीचे सहसंपादक अनिल गायकवाड, रणधुमाळीचे संपादक कैलास डुमणे, देवगिरी वृत्तचे संदीप मस्के आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...