दुर्दैवी घटना....कुटुंबाचा आधार गेला !

इमेज
पेरणीसाठी अर्थिक विवंचनेतील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या केज :- प्रतिनिधी... पेरणीसाठी पैसे नसल्याने हताश झालेल्या एका २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोरडेवाडी ता. केज येथे घडली आहे.  केज तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या कोरडेवाडी येथील तरुण शेतकरी बाबू सुभाष यादव वय (२६ वर्ष) या शेतकऱ्याच्या नावावर २ हेक्टर २० आर जमीन आहे. मागील आठवड्या पासून पाऊस पडू लागल्याने शेतकरी पेरणी करू लागले आहेत. बाबू यादव यांनी जवळ असलेल्या पैशातून थोडी फार पेरणी केली. मात्र पूर्ण शेताची पेरणी करण्यासाठी त्याच्या जवळ पैसे नसल्याने ते हताश झाले होते. पेरणी वेळेवर न झाल्यास शेती पडीक राहील, या विचाराने आलेल्या नैराश्यातून बाबू यादव यांनी टोकाची भूमिका घेऊन १ जुलै रोजी सकाळी १०:३० वा.च्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.  या घटनेची माहिती मिळताच जमादार पुरुषोत्तम शेप, पोलीस नाईक गोरख फड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, या घटनेची केज पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. मयत ...

शेतातील विद्युत मोटारी आणि वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ....

पावसाने अडवलं... अन् चोरांनी लुबाडलं!


गोवर्धन शिवारातून बोरवेलची ५ एचपी मोटार व वायर चोरी; पिके वाचविण्याचाच आधार हिरावला

परळी वैजनाथ, प्रतिनिधी :

      परळी वैजनाथ तालुक्यातील गोवर्धन येथील ७५ वर्षीय शेतकरी अनंत रंगनाथ जाधव यांच्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. एकीकडे पावसाने दडी मारल्याने पिकांना जगविण्यासाठी विहीर व बोरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली असताना, दुसरीकडे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील बोरवेलची ५ एचपीची मोटार आणि वीज वायर चोरी करून नेल्याने पिके वाचविण्याचाच आधार हिरावला गेला आहे.

        गोवर्धन शिवारातील 'चोपन' नावाच्या शेतातून जीके एनर्जी लिमिटेड कंपनीची ५ एचपीची मोटार व वीज वायर २३ ते २४ जूनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर अनंत जाधव यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र मोटार व वायरचा कोणताही मागमूस लागला नाही.अखेर २ जुलै रोजी त्यांनी सिरसाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १९२/२०२६ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        यंदा पावसाने उशीर केल्याने पिकांना जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना बोरवेल व विहिरीतील पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत सिंचनासाठी अत्यावश्यक असलेली मोटार आणि वायर चोरीला गेल्याने जाधव यांच्यासमोर पिके वाचविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. नैसर्गिक संकटाशी झुंज देत असलेल्या शेतकऱ्याला आता चोरट्यांच्या कृत्यामुळे आर्थिक फटका आणि मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सिरसाळा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल देवकते करीत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात शेतातील विद्युत मोटारी आणि वायर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा चोरट्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या