पोस्ट्स

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

अन्यथा करावी लागणार तुरुंगवारी...

इमेज
  बीड जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर मिरवणुकांवर बंदी - पोलीस अधीक्षकांनी दिले सक्त निर्देश बीड : पोलीस अधीक्षक नवनीत कावत, बीड जिल्हा यांच्याकडून सर्व नगरपरिषद उमेदवारांना तसेच त्यांच्या समर्थकांना सक्त निर्देशित करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात निकालानंतर मिरवणुकांवर बंदी असुन कायद्याच्या विरोधात जाईल असे कोणतेही कृत्य करण्याचे टाळावे असे पोलीस अधीक्षकांनी  सक्त निर्देश दिले आहेत.        आज होणाऱ्या मतमोजणीच्या निकालानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक, रॅली, विजयी जल्लोष, घोषणा, फटाके फोडणे किंवा जमाव जमविण्यास पोलीस प्रशासनातर्फे कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही.तसेच  जिल्हाधिकारी, बीड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून, सदर आदेश दि. 19/12/2025 रोजी रात्री 00.01 वा. पासून ते दि. 02/01/2026 रोजी रात्री 24.00 वा. पर्यंत लागू राहतील. विनापरवाना मिरवणूक काढणे, जमाव करणे, रस्ते अडविणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असा कोणताही प्रकार पूर्णतः प्रतिबंधित आहे.         आदेशाचे उल...

दुपारी दोन पर्यंत संपूर्ण निकालाचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित.....

इमेज
अशी होणार मतमोजणीची प्रक्रिया : 9 टेबलवर प्रभाग निहाय समांतर मोजणी; मुख्य दोन फेऱ्या होणार: चार तासात सर्व निकाल येणं अपेक्षित परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-       परळी नगर परिषद सार्वत्रिक  निवडणुकीची मतदान प्रक्रिया दि. ०२ डिसेंबर रोजी पार पडली. तर उर्वरित मतदान दि.२० डिसेंबर रोजी पार पडले.  आज शनिवार २१ डिसेंबर  रोजी निकालाची प्रक्रिया सकाळी १०  वाजल्यापासून सुरू होणार आहे. निवडणूक विभागाने त्याअनुषंगाने तयारी केली आहे. दरम्यान 9 टेबलवर प्रभागनिहाय समांतर मोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या मुख्य दोन फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी दोन तासाची अपेक्षित वेळ असुन त्या अनुषंगाने चार तासात संपूर्ण निकाल येणे अपेक्षित आहे.         परळी वैजनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रीयेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. मतमोजणी दिनांक 21.12 .2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या करिता 9 टेबलची व्यवस्था करण्यात ...

दोन लाख सत्तेचाळीस हजाराचा माल हस्तगत.....

इमेज
परळीत बेकायदेशीर दारूसाठ्यावर छापा; दोन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त परळी वैजनाथ : प्रतिनिधी...       परळीच्या पोलीस ठाणे संभाजीनगर हद्दीत बेकायदेशीर दारू साठवणूक व विक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मोठा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी  महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास परळी वैजनाथ येथील हॉटेल आबासाहेब समोरील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी बेकायदेशीररीत्या विविध कंपन्यांची दारू साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप उत्तमराव चव्हाण यांनी पथकासह छापा टाकून कारवाई केली.या कारवाईत रॉयल स्टॅग, मॅकडॉल, ओल्ड बॉम्बे, इम्पेरियल ब्ल्यू, आयकॉनिक व्हाइट, आफ्टर डार्क ब्ल्यू, सखु संत्रा, टँगो पंच, रुस्तुम गोल्ड, मॅजिक मोमेंट्स आदी विविध कंपन्यांच्या दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे दोन  लाखांहून अधिक रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.      या प्रकरणी पोलीस ठाणे संभाजीनगर येथे ...

हार्दिक अभिनंदन..

इमेज
  प्रा. श्री व्ही. टी. गित्ते यांना गणित विषयात पीएच्. डी. प्रदान                परळी वैजनाथ : नागनाथआप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालय परळी वैजनाथ येथील प्रा. व्यंकट तातेराव गित्ते यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर यांच्याकडून 12 डिसेंबर 2025 रोजी गणित या विषयात पीएच्. डी. प्रदान करण्यात आली आहे.                    श्री. गित्ते यांनी "CONVECTION AND MASS TRANSFER EFFECTS ON ROTATING FLOW AND GRAVITY MODULATION" या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. त्यासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून उत्तमचंद बगडिया महाविद्यालय, रिसोड येथील प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी सर होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक पाचपट्टे सर, प्रा. डॉ. रवींद्र लहुरीकर सर व गणित अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. जगदीश ननवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. बाह्य परीक्षक म्हणून पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठाचे गणित विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगदीश ता...

नांदेड महापालिका निवडणूक..

इमेज
  ना. पंकजा मुंडे यांची नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रभारीपदी नियुक्ती  मुंबई।दिनांक १९। राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज एका पत्राद्वारे ही नियुक्ती केली आहे.    स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक 2025 नांदेड महानगरपालिका निवडणुकीकरिता आपली नियुक्ती करण्यात आल्याचे आज घोषित करण्यात आले. आपण आपल्या संघटन कौशल्याने भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याकरिता सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे असं पत्रात नमूद करून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  ••••

निवडणूक प्रभागातील १५ मतदान केंद्रावर राहणार सीसीटीव्हीची नजर

इमेज
  परळी नगर परिषद निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार उर्वरित प्रभागातील जागासाठी आज मतदान  निवडणूक प्रभागातील १५ मतदान केंद्रावर राहणार सीसीटीव्हीची नजर आज होणाऱ्या मतदानासाठी प्रभागातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा- निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-         राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार परळी वैजनाथ नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उर्वरित नगर परिषदेच्या 3 प्रभागातील ४ नगर सेवकपदासाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. या जागासाठी शनिवार दि. २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ४ जागेसाठी 14, 238 मतदार मतदान हक्क बजावणार आहेत. दुबार मतदान असणाऱ्याना करता येणार एकाच ठिकाणी मतदान व हमीपत्र सादर करावं लागणार आहे. तर दुबार मतदान केल्यास कारवाई होणार आहे. तर प्रभागातील मतदान केंद्रावर सिसिटीव्ही निगरानी राहणार आहे. तरी आज होणाऱ्या मतदानासाठी उर्वरित  प्रभागातील मतदार बांधवानी लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिका...

आज सुट्टी जाहीर....

इमेज
  नगरपालिका व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक सुट्टी जाहीर बीड : राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदारांना निर्भय व सुलभरीत्या मतदान करता यावे , या उद्देशाने बीड जिल्ह्यातील संबंधित क्षेत्रांसाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे . महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि . १९ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार , ही सार्वजनिक सुटी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी निर्गमित केले आहेत . सदर आदेशानुसार राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने शनिवार दि . २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून , त्या दिवशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुटी लागू राहणार आहे . यामध्ये बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई , पाटोदा , परळी वैजनाथ , किल्लेधारूर आदी नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांचा समावेश आहे . या सार्वजनिक सुटीचा लाभ संबंधित मतदारसंघातील सर्व मतदारांना मिळणार असून , मतदानाच्या दिवशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्...

रामरक्षा गोशाळेने गो सेवेत आदर्श निर्माण निर्माण केला: प्रशासनाकडून कौतुक !

इमेज
  रामरक्षा गोशाळेला पशुसंवर्धन व दुग्धविकास सचिव डॉ. एन. रामास्वामी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट रामरक्षा गोशाळेचे गो संगोपनाचे काम अतिशय चांगले आणि कौतुकास्पद- पशुसंवर्धन व दुग्धविकास सचिव डाॅ. एन .रामास्वामी रामरक्षा गोशाळेने गो सेवेत आदर्श निर्माण निर्माण केला: प्रशासनाकडून कौतुक ! परळी वैजनाथ, प्रतिनिधी..             पशुसंवर्धनाच्या क्षेत्रात गोशाळा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या अनुषंगाने परळी वैजनाथ येथील रामरक्षा गोशाळेने गो संगोपनाचे अतिशय नीटनेटके आणि सर्व दृष्टीने चांगले संगोपन केले आहे. ही गोशाळा एक आदर्श गोशाळा असून हे काम कौतुकास्पद असल्याचे महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाचे सचिव डाॅ. एन. रामास्वामी यांनी गौरवोद्गार काढले.डाॅ. एन रामास्वामी यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामरक्षा गोशाळेला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणची व्यवस्था आणि गोसेवेचे आदर्श काम पाहून प्रशासनाकडून या गोशाळेचे कौतुक करण्यात आले.       परळी व परिसरामध्ये आपल्या गो सेवेतून एक आदर्श निर्माण ...

प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी....

इमेज
  नगर परिषद निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ईदगाहच्या संरक्षणाची मागणी परळी / प्रतिनिधी  दि. 21 डिसेंबर 2025 रोजी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची मागणी एका निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांचे समर्थक गुलाल उधळत जल्लोष करत असतात. हा जल्लोष परळी शहर पोलीस ठाण्यासमोरील नेहरू चौक तळ परिसरातील ईदगाह परिसरातून जात असताना गुलाल अथवा इतर साहित्य ईदगाहवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊन शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.      यासंदर्भात तहसीलदार नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले असून, निवडणूक निकालाच्या दिवशी ईदगाहला तात्पुरत्या पडद्याने झाकण्यात यावे तसेच परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करून संभाव्य अनुचित प्रकार टाळावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरात सलोखा, शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, तसेच कोणताही अनुच...

गोदावरी खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण....महाराजांनी केलं महत्त्वपूर्ण भाष्य...

इमेज
नाशिकच्या कुंभाआधीच परळीत दोन दिवस कुंभमेळ्या सारखे धार्मिक वातावरण : मुलुक पीठाधिश्वरांसोबत 700 साधूंचा मेळा वैद्यनाथ चरणी नतमस्तक ! हिंदुस्थानात ना कोणी इसाई ना कोणी मुस्लिम, इथले सगळे मूळ हिंदूच - मुलुकपीठाधीश्वर राजेंद्रदास देवाचार्य महाराज यांचं खळबळजनक व्यक्तव्य परळी वैजनाथ,  प्रतिनिधी...          वृंदावनच्या मुलुकपिठाचे पीठाधीश्वर प्रसिद्ध गोसेवक संत स्वामी राजेंद्रदास देवाचार्य महाराज हे सातशे साधुंसह गोदावरी परिक्रमा यात्रा करत आहेत. ही यात्रा पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ येथे दाखल झाली. एक दिवसाचा मुक्काम आणि प्रभू वैद्यनाथला रुद्राभिषेक असा दोन दिवसाचा धार्मिक सोहळा साजरा झाला. साधुसंत, भगवी वस्त्र परिधान केलेले, पिवळे वस्त्र परिधान केलेले, जटा वाढलेले वेगवेगळ्या मुद्रा धारण केलेले असे वेगवेगळ्या सांप्रदायाचे साधू यांनी वैद्यनाथ मंदिर परिसर गजबजुन गेला होता. नाशिक येथे पुढच्या वर्षी कुंभमेळा होणार आहे. मात्र या कुंभाआधीच परळीच्या वैद्यनाथ मंदिरात दोन दिवसाचा कुंभमेळाच भरल्यासारखे चित्र बघायला मिळाले. या गोदावरी परिक्रमा यात्रेचे परळीकर भाविकां...

दिल्लीतील 'शहा' भेटीतून... परळीला 'प्रसाद' मिळणार !

इमेज
  धनंजय मुंडे दिल्लीत: अमित शहांची भेट :भेटीचे कारण आले समोर  नवी दिल्ली....     महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेतली. या भेटीची माहिती समोर येताच राज्यातील राजकारण ढवळून निघाले. दिल्ली वारी आणि अमित शहा यांची घेतलेली भेट यावरून अनेक राजकीय तर्क वितर्क अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी का घेतली? याबाबतचे कारण आता समोर आले आहे. धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेऊन पंचम ज्योतिर्लिंग वैजनाथ तीर्थक्षेत्राचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करावा अशी प्रमुख मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर परळी व मतदार संघातील विविध प्रश्न आणि एकात्मिक विकासाबाबतच्या अनेक गोष्टींवर त्यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे.         केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धनंजय मुंडे यांनी भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने २०१४-१५ मध्ये तीर्थयात्रा पुनरुज्जीव...

पोलीस पाटील भरती प्रक्रिया......

इमेज
परळी वैजनाथ उपविभागातील 99 गावांच्या प्रस्तावित रिक्त पोलीस पाटील पदासाठी 19 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       परळी वैजनाथ  उपविभागा अंतर्गत येणाऱ्या गावांमधील पोलीस पाटील पदाची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने गावनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी बीड यांनी दिनांक 14 रोजी परिपत्रक काढले आह.  या अनुषंगाने रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस पाटील रक्त पदांचे प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण घोषित करण्यात येणार आह. परळी उपविभागातील 99 गावांच्या प्रस्तावित रिक्त पोलीस पाटील पदासाठी दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता प्रशासकीय इमारत परळी वैजनाथ येथे सोडत होणार आहे.       बीड जिल्हाधिकारी यांनी दिनांक 14 डिसेंबर रोजी परिपत्रक काढले असून पोलीस पाटील भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने गावनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी वेळापत्रक ठरवून दिलेले आहे. या भरती प्रक्रियेचे टप्पेही जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक 15 डिसेंबर ते २० डिसेंबर 2025 या कालावधीत जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे व गावनिहाय आरक्षण निश्चित करणे, दिनांक 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2025 या काल...

दुःखद वार्ता....भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  सेवानिवृत्त तहसीलदार शशिकांत देशपांडे यांचे निधन बीड -येथील सेवानिवृत्त तहसीलदार शशिकांत देशपांडे यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 87 वर्ष होते. बीड येथे तहसीलदार म्हणून सेवानिवृत्त झालेले शशिकांत देशपांडे हे मनमिळाऊ स्वभावाचे, कडक शिस्तीचे म्हणून परिचित होते. आपल्या नोकरीच्या काळात प्रामाणिकपणा आणि सचोटी मुळे ते लोकप्रिय होते.गेल्या तीन साडेतीन वर्षांपासून ते आजारी होते. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बीड येथील प्रसिद्ध डॉक्टर सुहास देशपांडे यांचे तर वडील होते.

किसान सभेचा आंदोलनाचा प्रवित्रा...

इमेज
कापूस, सोयाबीन जाचक अटी दूर करत तात्काळ खरेदी करा-किसान सभा परळी / प्रतिनिधी.... अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीन शेत मालाची खरेदी हमीभावाने खरेदी करताना जाचक अटी टाकून केंद्र आणि राज्य सरकारने बाजार पेठेतील शेत मालाच्या समतोल राखण्यापेक्षा, शासकीय हमीभावाने खरेदी करण्यास सरकार असमर्थ असल्याने हमीभावाने खरेदी टाळण्यासाठी जाचक अटी घालत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात खुल्या बाजारात व्यापा-याकडे विक्री करण्याचे हे षडयंत्र सरकार करत असून शासकीय खरेदी करताना येणाऱ्या अडचणी दूर करून कापूस, सोयाबीन शेतमाल हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अथवा याकरिता किसान सभेकडून आंदोलनाचा प्रवित्रा घेण्यात येईल असा इशारा किसान सभेच्या पदाधिकारी यांनी मंगळवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन करत मागणी केली.           यंदाच्या खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादनात कमालीची घट झाली आहे. वारंवार मागणी करून शासनाने सीसीआय, पणन महासंघ यांनी...

पंकजाताईंना....खातं कोणतंही असो.... एक वेगळी ओळख देण्याच काम

इमेज
  वर्षपूर्ती.. अभ्यासपूर्ण अन् नियोजनबद्ध कामकाजाची.....         पंकजा गोपीनाथ मुंडे..महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वजनदार नाव..मंत्रिमंडळातील खातं कोणतंही असो, त्याला आपल्या अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध कामकाजातून एक वेगळी ओळख देण्याचं काम त्या करतात. पर्यावरण व पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री म्हणून त्यांच्या जबाबदारीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गत वर्षभरात अनेक चांगले निर्णय घेऊन त्यांनी पर्यावरण व पशुसंवर्धन खात्याला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी जनहिताचे घेतलेले महत्वाचे निर्णय असे... पशुसंवर्धन विभाग • पशूसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा  • पशुसंवर्धन व्यवसायाला सवलतीच्या दरात वीज आकारणी  • कृषी प्रमाणे कुक्कुट पालन व इतर पशुसंवर्धन व्यवसायासाठी सौर उर्जा व ग्रामपंचायत करात सवलत  • पशुपालन व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या खेळत्या भागभांडवलासाठी (Working Capital) घेतलेल्या कर्जावरील व्याज दरात ४% पर्यंत सवलत  • पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या • पशुसंवर्धन विभाग सक्षम होण्यासाठी विभागातील रिक्त प...

बीड-अंबाजोगाई - लातूर रोडवरील जिल्हा सरहद्दीवर भीषण अपघात

इमेज
  भरधाव वाहनांची समोरासमोर धडक; तीन ठार तर आठ जण गंभीर जखमी बीड- अंबाजोगाई - लातूर रोडवरील जिल्हा सरहद्दीवर  भीषण अपघात अंबाजोगाई, प्रतिनिधी... बीड- अंबाजोगाई - लातूर रोडवरील जिल्हा सरहद्दीवर स्कार्पिओ व हुंडाई एक्सेंट या वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर आठ जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सर्व जखमीवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  बीड - लातूर महामार्गावर लातूर जिल्ह्याच्या सीमेजवळ काल सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे. स्कार्पिओ गाडी आणि कारची समोरासमोर धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर आठ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन कारमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्कॉर्पिओ आणि अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला करण्यात आली. अपघातातील जखमींना तातडीने लातूर ...

साधु-संत येती घरा......तोचि दिवाळी दसरा !!!!

इमेज
गोदावरी परिक्रमा यात्रा : मलूकपीठाधीश्वर पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह शेकडो साधु संतांचे बुधवारी परळीत आगमन  परळी वैद्यनाथ दि.१५(प्रतिनिधी)      गोदावरी परिक्रमा यात्रेनिमित्त बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री  मलूकपीठाधीश्वर पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह शेकडो साधु संतांचे बुधवारी परळीत आगमन होत आहे.येणार्या साधु संताचे स्वागत व मोटारसायकल रॅलीत परळी पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वागत समीतीच्या वतीने करण्यात आले आहे. बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक,ईटके काॅर्नर परळी वैद्यनाथ या ठिकानाहुन पुज्य राजेंद्रदास देवाचार्य महाराजासह ३५० साधु संतांचे परळीकरांच्या वतीने स्वागत करून मोटारसायकल शोभा रॅलीस प्रारंभ होईल.ही रॅली शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल ,एकमिणार चौक,स्टेशन रोड,राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक,ते प्रभु वैद्यनाथ मंदिर या ठिकाणी रॅलीचा समारोप होणार आहे.या रॅली मार्गावर ठिक ठिकाणी पुष्पवृष्ठी करण्यात येणार आहे. नंतर प्रवचन मंडप वैद्य...

अपेक्षित दर न मिळाल्यास ऊस पुरवठा बंद करणार

इमेज
ऊस दरावरून शेतकऱ्यांनी रोकला राष्ट्रीय महामार्ग 5 तास रास्ता रोको; वाहतूक पूर्ण ठप्प अपेक्षित दर न मिळाल्यास ऊस पुरवठा बंद करणार परळी / प्रतिनिधी....बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यासह सोनपेठ, गंगाखेड परिसरातील असंख्य शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याऱ्या गंगाखेड येथील जी 7 साखर कारखाना व लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याने सुरू असलेल्या गळीत हंगामात पहिली उचल 3 हजार व अंतिम भाव 4 हजार रु देण्यात यावा याकरिता सोमवार दि 15 रोजी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको केले. सलग 5 तासापासून हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने परळी-परभणी मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प होऊन   असंख्य वाहनांच्या रांगा दुतर्फा लागलेल्या होत्या. मागण्याकरिता जिल्हाधिकारी स्तरावर बैठक आयोजित करण्यात आल्याने हे रास्ता रोको स्थगित करण्यात आले आहे. साखर कारखान्याने अपेक्षित दर न दिल्यास ह्या कारखान्यावर ऊस न देता बहिष्कार टाकण्याचा मानसिकतेत ऊस उत्पादक शेतकरी असून कारखान्याना ऊस पुरवठा करण्या-या गावात याबाबत बैठक देखील शेतकरी घेणार आहेत.       वाढती महागाई, खते व निविष्ठा दरवाढ यामुळे उत्पादन ख...

15 जानेवारीला होणार मतदान...

इमेज
  राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुका जाहीर  उमेदवारी अर्ज भरणे ------२३ डिसेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस ------३० डिसेंबर उमेदवारी अर्जाची छाननी -----३१ डिसेंबर अर्ज मागे घेण्याचे मुदत -----२ जानेवारी चिन्ह वाटप ------३ जानेवारी मतदान --१५ जानेवारी मतमोजणी -----१६ जानेवारी            महाराष्ट्र राज्यातील 29 महापालिका निवडणुकी संदर्भात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. एकूण 29 महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे.त्यामधील 27 महानगरपालिकांचे मुदत संपलेली आहे. पाच महापालिकांचे 2020 मध्येच मुदत संपली होती. जालना आणि इचलकरंजी या दोन नवनिर्मित महापालिका आहेत. मुंबई महापालिकेत प्रभागामध्ये एक सदस्य प्रभाग आहेत आणि यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त एक मत द्यावे लागेल. 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत.  बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागांमध्ये चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्या महापालिकेमधील काही प्रभाग असे आहेत की जिथे तीन उमेदवार असतील. काही प्रभाग असेल  असतील की जिथे पाच उमेदवार असतील. त्यामुळे या...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!