प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 परळी वैजनाथ येथे ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्याचे आयोजन




परळी (प्रतिनिधी)...

     दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत गजानन महाराज विश्वस्त मंडळ विद्यानगर परळी च्या वतीने माघ वद्य पंचमी ६ फेब्रुवारी २०२६ पासून चरित्र पारायण सोहळा व हरिनाम सकिर्तनाचा त्रिदिवसीय कार्यक्रम होणार आहे.

दैनिक धार्मिक कार्यक्रमा मध्ये पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ७ ते १० चरित्र पारायन, १० ते १२ महिला भजनी मंडळ यांचे भजन, तर रात्री ८ ते ११ या वेळेत कीर्तन होणार आहेत.  दि. ६ फेब्रु. रोजी श्री ची पुजा, अभिषेक व सकाळी ८ ते १० पारायण नंतर १० ते १२ या वेळेत तपोवन महिला भजनी मंडळ यांचे भजन, तर रात्री ८ ते ११ या वेळेत ह.भ.प. श्री गोविंद महाराज, परळी वैजनाथ यांचे कीर्तन होणार आहे. ७ फेबु रोजी सकाळी श्री ची पुजा, अभिषेक व सकाळी ८ ते १० पारायण नंतर गजानन महाराज महिला भजनी मंडळ परळी वैजनाथ यांचे भजन, तर रात्री ८ ते ११ ह.भ.प. डॉ. नेरकर महाराज, परळी वैजनाथ  यांचे कीर्तन तर उत्सव सोहळा सांगता ८ फेबुवारी रोजी प्रगट

 दिनी सकाळी ८ ते १० श्री ची पालखी मिरवणूक,  सकाळी १० ते १ या वेळेत  प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सौ स्मिताताई आजेगावकर  यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मागील २३ वर्षापासून या धार्मिक सोहळ्याची अखंड परंपरा सुरु असुन विश्वस्त मंडळ यांच्या अथक परिश्रमा तून याठिकाणी धार्मिक कार्यक्रमासह विविध समाजोपयोगी उपक्रमही घेण्यात येतात. यामधे रक्तदान, परिसर स्वच्छता, दर गुरुवारी भजन यांचा

समावेश असतो. मंदीर स्थापनेप- पासुन दर गुरुवारी श्रींना पिठल भाकरी चा नैवेद्य, हरीपाठ, आरती, पुजा असे कार्यक्रम घेण्यात येतात. विश्वस्त मंडळासह परिसरातील भाविकांसह नागरिकांचाही यात हिरिरीने सहभाग असतो. भक्त

प्रगट दिन सोहळ्या निमीत्त सलग तिन दिवस या ठिकानी यात्रेचे स्वरुप पहावयास मिळते. याही वर्षी माघ वद्यपंचमी पासून सुरू होत असलेल्या या भरगच्च धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हरिनाम संकीतर्नाचा त्रिदिवसीय कार्यक्रम

* मागील २३ वर्षांची अखंडीत परंपरा

* धार्मिक कार्यक्रमांसह विविध समाजोपयोगी उपक्रम

* परळीसह पंचक्रोशीतून भाविकांची अलोट गर्दी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या