प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

 गर्भगिरीच्या दरीत दोन मृतदेह सापडल्याने खळबळ



कडा  :-आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान(मायंबा) परिसरात गुरुवारी हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मच्छिंद्रनाथ गडावर देवदर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचे मृतदेह गडावरील खोल दरीत आढळून आले असून, यातील एका तरुणाचा केवळ सापळा उरला आहे, तर वृद्धाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

सरपण वेचताना मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ...

     गडावरील खोल दरीत सरपण गोळा करण्यासाठी काही स्थानिक नागरिक गेले होते.दरीच्या दुर्गम भागात त्यांना मानवी अवशेष दिसताच त्यांनी गावात धाव घेऊन माहिती दिली.अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुर्गम भाग असल्याने पोलिसांनी मोठ्या शर्थीने हे मृतदेह बाहेर काढले

कुटूंबियांना ओळख पटली अन् एकच आक्रोश

     मयत निलेश नारायण घोंगरे (वय २६, रा.बेलापूर खुर्द,जि.अहिल्यानगर) हा महिनाभरापूर्वी गडावर दर्शनासाठी आला होता,पण तिथूनच तो बेपत्ता झाला होता.त्याच्या घरच्यांनी अंभोरा पोलिसात तक्रारही दिली होती.दरीत सापडलेला सापळा निलेशचाच असल्याची ओळख पटताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.दुसरा मृतदेह दिनकर नाना घडशिंग (वय ६५,रा.भिलवाडा,पाथर्डी) या वृद्धाचा असल्याचे निष्पन्न झाले.

भोळेपणात दरीत पडल्याचा संशय...

दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.हे भाविक भोळसर प्रवृत्तीचे असल्याने किंवा रस्ता चुकल्याने दरीत पडले असावेत,अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.उपनिरीक्षक देवीदास सातव आणि सोपान येवले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या