प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती परळी शाखेची नूतन कार्यकारणी जाहीर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती परळी शाखेची नूतन कार्यकारणी जाहीर




अध्यक्षपदी नवनाथ दाने, कार्याध्यक्ष अशोक मुंडे तर प्रधान सचिव विकास वाघमारे यांची निवड

परळी प्रतिनिधी.......महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,शाखा परळीच्या अध्यक्षपदी नवनाथ दाने यांची यांची तर कार्याध्यक्ष पदी अशोक मुंडे आणि प्रधान सचिव म्हणून पत्रकार विकास वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.

      महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीची 2026 या नुतन वर्षाची कार्यकारणी नुकतीच निवडण्यात आली. परळी येथील जिजामाता उद्यान येथे शिक्षक नेते पी.एस.घाडगे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत जिल्हा प्रधान सचिव पत्रकार सुकेशनी नाईकवाडे, अंनिस चे जेष्ठ सदस्य रानबा गायकवाड,प्रा.दासू वाघमारे सर, जेष्ठ पदाधिकारी प्रा.विलास रोडे सर ,जिल्हा सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग प्रमुख पत्रकार संजीब राॅय सर ,वंचित चे जिल्हा सचिव मिलिंद घाडगे आदी उपस्थित होते.

    यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नुतन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष पदी नवनाथ दाने, उपाध्यक्ष रतन उजगरे, महादेव आजले, कार्याध्यक्ष अशोक मुंडे तर प्रधान सचिव पत्रकार विकास वाघमारे, विविध उपक्रम विभाग विठ्ठल झिलमेवाड, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग प्रा. सुरेश जाधव, बुवाबाजी संघर्ष विभाग पत्रकार बालाजी ढगे, प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग दिपक सिरसाट, विवेक जागर प्रकाशन व वितरण विभाग भानुदास उपाडे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, निधी व्यवस्थापन विभाग प्रा. विलास रोडे, महिला सहभाग विभाग चित्रा देशपांडे, युवा सहभाग विभाग सुनील मुंडे, संस्कृतिक अभिव्यक्ती विभाग राहुल सूर्यवंशी, मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग डॉ. आकाश वाघमारे, कायदाविषयक व्यवस्थापन विभाग ॲड. दिलीप उजगरे, जातपंचायत मूठमाती अभियान विभाग अनिल मस्के, मिश्र विवाह प्रोत्साहन विभाग वैजनाथ जगतकर, जोडीदाराची विवेकी निवड विभाग प्रा. दासु वाघमारे, सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग आनंद तुपसमुद्रे , विज्ञान बोध वाहिनी विभाग महादेव धायगुडे, विवेक वाहिनी विभाग प्रा. प्रदिप बुकतर, राष्ट्रीय समन्वय विभाग भगवान राठोड, दस्तावेज संकलन विभाग केशव मुंडे तर सदस्य संदिप मस्के,अनिरुद्ध गायकवाड, विनायक काळे या सर्वांची नूतन कार्यकारणी मध्ये निवड झाली आहे या नवीन कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या