प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

थेट बारामतीतील चित्रांकन वृत्तांतच आता पक्क्या बारामतीकर झालेल्या परळीच्या एका लेकीने मांडला

दादा गेल्याचे मन मानायला तयार होईना, रात्रभर सर्वसामान्य बारामतीकरांना झोप नाही !

परळी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त किती तीव्र धक्कादायक होते, याचा प्रत्यय सर्वसामान्य बारामतीकरांच्या भावना ऐकल्यानंतर आला. दादा हयात नाही, यावर विश्वासच बसत नसून, मन वास्तव स्वीकारायला तयार होत नाही.  केवळ डाळ-भात (वरणभात) शिजवूनच अनेकांनी दिवस काढला. तर रात्रभर प्रत्येक गल्ली, काॅलन्यांमधील बारामतीकरांच्या डोळ्याला डोळा लागलेला नव्हता. असे शोकमग्न वातावरण अजित दादांच्या निधनाचे वृत्त धडकल्यापासून ते अंत्यविधीचे सोपस्कार पार पडेपर्यंत होते. आणि पुढचेही काही दिवस बारामती शोकाकूलच असेल, असा चित्रांकन वृत्तांतच आता पक्क्या बारामतीकर झालेल्या परळीच्या एका लेकीने मांडला आहे.

संगीता नाईक, असे त्यांचे नाव आहे. अध्यापनाच्या क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संगीता नाईक या मूळच्या परळीच्या आहेत. त्या माहेरच्या देवज्ञे आहेत. जुन्या परळीतील सावता महाराज मंदिर परिसर, गणेशपार भागात बालपण गेलेल्या संगीता नाईक-देवज्ञे या आता मागील २५-३० वर्षांपासून बारामतीत वास्तव्यास आहेत.

अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्तानंतरची बारामतीची परिस्थिती याविषयी संगीता नाईक-देवज्ञे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सकाळी आम्ही आमच्या क्लासमध्ये मुलांना शिकवण्याचे काम करत होतो. अचानक साडे नऊच्या सुमारास दादांचा अपघात झाला आणि ते आता हयात नाहीत, ही दु:खद आणि धक्कादायक बातमी कानी आली. त्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. तत्क्षणी मोबाईल फोनवरील बातम्या पाहिल्या. त्यावरही दादांच्या निधनाचे वृत्त होते. परंतु मन मानायला तयार नव्हते. एक क्षण असे वाटले बातमी खोटी आहे. तातडीने क्लास सोडून देण्यात आला. मुलांना सुरक्षितपणे घरी पाठवण्याची व्यवस्था सर्वच स्तरातून करण्यात येत होती.

दादांचा घातपात झाला असावा, अशीही शंका अनेकांकडून व्यक्त करण्यात येत असल्याने सर्वसामान्य बारामतीकरांच्या भावना तीव्र होत्या. परंतु सायंकाळी मोठ्या साहेबांनी (शरद पवार) घातपात आणि अपघात, याविषयीची भूमिका स्पष्ट केल्याने बारामतीकर शांत झाला. परंतु दिवसभर त्याने काहीही खाल्ले नाही. जेवणावरची त्याची इच्छाच उडाली होती. काॅलन्या, वस्त्या, गल्ल्यांमधील बारामतीकर रात्रभर जागेच होते. कोणाच्याही डोळ्याला डोळा लागला नाही. अजूनही दादा हयात नाहीत, हे मन मानायला तयार नाही. दादांचा अंत्यविधी पार पडला ते विद्या प्रतिष्ठान हे आमच्या घरापासून पाच ते सात किमी अंतरावर असल्याने आम्ही अनेक बारामतीकर काटेवाडीहून पार्थिव आणतानाच्या मार्गात उभे होतो. रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी होती. गुरुवारी चौका-चौकात जनसागर उसळला होता. गर्दीमुळे अनेकांना दादांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता आले नाही, तीही हळहळ अनेक जण व्यक्त करत होते, असेही संगीता नाईक-देवज्ञे यांनी सांगितले.

दादांच्या कामाच्या झपाट्याची प्रतिमा सर्वश्रुत आहे. परंतु त्याचे उदाहरण बारामतीकरांना कायम प्रत्यक्षात पाहण्यात येत होते. सकाळी सहाच्या सुमारास लेकी-बाळी घरासमोर सडासंमार्जन करताना त्यांना आठवड्यातून एखाद्या दिवशी बारामतीतून दादांचा ताफा जाताना दिसायचा. खरं तर ते एखादे विकासाचे काम पाहून परत माघारी परतलेले असायचे. तेव्हाच लक्षात यायचे की सहा वाजता जर त्यांचा ताफा परत जात असेल तर किमान पहाटे पाचलाच दादांनी घर सोडून प्रत्यक्ष साईट गाठले असणार. असा त्यांचा वकुब होता आणि बारामतीकरांना परिचितही होता, असेही संगीता नाईक-देवज्ञे म्हणाल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या