प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अभिवादन

 31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभास उपस्थित रहावे - वैभव स्वामी 



बीड जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अभिवादन

बीड, प्रतिनिधी.... 

वंचित, शोषित, पीडित,सामान्य घटकांचा आवाज होण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 106 वर्षापूर्वी मूकनायक हे पहिले वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक डी जी वानखेडे यांना मूकनायक 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अभिवादन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला सर्व पत्रकार आणि आंबेडकर प्रेमी व अजित दादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी केले आहे. 

बीड येथील तुलसी संगणक कॉलेज सभागृह, आदर्श नगर,डीपी रोड, बीड येथे महामानव अभिवादन ग्रुप व महामानव सार्वजनिक वाचनालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी रोजी मूकनायक दिन समारंभ सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सीईओ पी व्ही बनसोडे लाभणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री संपादक गंमत भाऊ भंडारी, दिलीप खिस्ती, सुनील क्षीरसागर, शेख तय्यब,उत्तम हजारे, वैभव स्वामी, संदीप बेदरे,तसेच प्राचार्य डी जी निकाळजे, उपप्राचार्य डॉ. उत्तम साळवे, संदीप उपरे जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, सीए बी बी जाधव, पत्रकार दत्ता देशमुख, गणेश सावंत, संजय मालानी,दिनेश लिंबेकर,किशोर कागदे,वेंकटेश वैष्णव, अशोक वाणी, सुनील डोंगरे, अमोल मुळे, सावंत सर, बालाजी जगतकर, दीपक काळकुटे, मिलिंद आदमाने,साहस आदोडे,दीपक थोरात, राजू जोगदंड, दिलीप तरकसे, प्रदीप कांबळे, ससाने, शिरीष शिंदे,नितीन मुजमुले, संदीप मोराळे, गणेश कानडे, संपादक शेख आयेशा यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमांमध्येच पत्रकार संघाच्या वतीने महामानव अभिवादन ग्रुप आणि महामानव सार्वजनिक वाचनालयाचे प्रणेते, सेवानिवृत्त प्रयोगशाळा तज्ञ, जनसेवक डी जी वानखेडे यांचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांना मूकनायक 2026 या पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाच्या पूर्वी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सर्वांच्या कामाचा माणूस म्हणजेच लोकप्रिय अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी याकरता भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. 

या मूकनायक दिन समारंभास आणि अभिवादन कार्यक्रमास संवेदनशील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या