पोस्ट्स

इमेज
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश- पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची माहिती मुंबई, दि. १३ - राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयामुळे मुरघास संयंत्रांच्या माध्यमातून वैरण विकासाला चालना मिळणार असून पशुपालकांसाठी स्थिर व परवडणारा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समूह पातळीवर काम केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण भागात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. या निर्णयानुसार आता वैयक्तिक लाभार्थ्यांबरोबरच शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी समूह गट, महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेली समुदाय आधारित  संसाधन केंद्रे आणि उमेद नोंदणीकृत प्रभाग संघ यांनाह...
इमेज
  गणेशपार डीपीच्या देखभालीकडे महावितरण चे दुर्लक्ष; परळीत 'आम आदमी पार्टी'चा आंदोलनाचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी): शहरातील गणेशपार भागातील विद्युत डीपीच्या देखभालीसाठी वारंवार विनंती करूनही महावितरण प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांनी केला आहे. येत्या काही दिवसांत गणेशपार डीपीचे मेंटेनन्स न झाल्यास व्यापारी व नागरिकांसह महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशपार भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात महावितरण कार्यालयाला लेखी अर्ज देऊन आठ दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. थकीत वीजबिल असल्यास तातडीने वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणला ग्राहकांच्या समस्यांचे सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसत आहे. "वारंवार वीज गेल्यामुळे होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाची भरपाई महावितरण देणार का?" असा सवाल विजय जोशी यांनी उपस्थित ...
इमेज
  नात्याला काळीमा फासणारी निंदनीय घटना : सावत्र पित्याचा १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार  केज :- सावत्र पित्याने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक आणि नात्याला काळीमा फासणारी निंदनीय घटना केज शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसात बलात्कार व पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.  केज शहरात वास्तव्यास असलेल्या पीडित १३ वर्षीय मुलीच्या आईने दोन मुली झाल्या नंतर  पती सोबत जमत नसल्या वरून नऊ वर्षां पूर्वी वेगळे झाली. त्या नंतर आठ वर्षा पूर्वी आरोपी सोबत दुसरे लग्न केले. या दुसऱ्या पती पासून तिला एक मुलगा झाला. पीडित मुलगी ही आई व आईने केलेल्या दुसऱ्या पती सोबत एकत्र राहतात. तिची आई ही ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता माहेरी गेली. तर पीडित मुलगी ही एकटीच घरी होती. दुपारी १२.३० सावत्र पित्याने घरी येऊन पीडित मुलीला आई कुठे गेली? अशी विचारणा केली. तिने गावाकडे गेलेल्या आईला फोन करून कधी येणार आहेस. असे विचारले. मात्र आईने वेळ लागेल असे सांगितले. हीच संधी साधून सावत्र पित्याने साडेतीन वर्षाच्या मुलाला मोबाईल देऊन खाली बसविले. पीडित मुलीला कॉटवर बस...

लक्षवेधी शोभायात्रा.....

इमेज
लक्षवेधी शोभायात्रा  : म.ज्योतिराव फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी म.ज्योतिराव फुले यांनी  सर्वांना शिक्षणाची दारे खुली केली - माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी):           क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त परळी वैजनाथ शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेचा शुभारंभ करून अभिवादन केले.     माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अंजली माळी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शोभायात्रेचा प्रारंभ झाला. याप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन केल्यानंतर बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी सांगितले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी विषमतेविरुद्ध लढा देऊन बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. आजही त्यांचे सत्यशोधक व...
इमेज
समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद  महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळयास परळीत सुरुवात  परळी प्रतिनिधी.     प्रसिद्ध खंजिरी वादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवन महाराज दवंडे यांच्या शिव, फुले ,शाहू, आंबेडकर समाज प्रबोधन कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. परळी शहरातील शिवाजीनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने संयुक्त जयंती सोहळ्यास काल दिनांक 11 एप्रिल पासून सुरुवात झाली.    क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची 199 जयंती 11 एप्रिल रोजी तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात येत आहे .या निमित्ताने शिवाजीनगर परळी येथे संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली. रात्री 8  वाजता लुंबिनी बुद्ध विहार येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन दिव्यांग विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक अजयकुम...
इमेज
स्वामी श्रध्दानंद गुरूकुल येथे वैद्य व आचार्यजी फक्त आदेश न देता काम करतात - विलास ताटे  परळी वै. प्रतिनिधी -     स्वामी श्रध्दानंद गुरूकुल येथे वैद्य व आचार्यजी फक्त आदेश न देता काम करतात असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते विलास ताटे यांनी केले आहे.  नंदागौळ रोडवरील परळी आर्यसमाज अंतर्गत स्वामी श्रध्दानंद गुरुकुल येथे विद्यार्थ्यांना शिक्षण, भारतीय संस्कृतीचे धडे, व्यायाम, आहारविहार विषयी मार्गदर्शन केल्या जाते. शिवाय या ठिकाणी स्त्री-पुरुष यांच्यावर चांगल्या प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात पंचकर्म केले जाते. त्यामुळे या ठिकाणी अनेकांचा ओढा दिसुन येतो. विशेष म्हणजे आजही विज्ञानमुनी नाडी परिक्षा करुन अनेकांना योग्य ते मार्गदर्शन करतात. येथील सत्येंद्रजी आचार्यजी विद्यार्थ्यांना केवळ आदेशच न देता स्वतःही काम करतात या गुरुकुलवर पूर्ण नियंत्रण आर्यसमाजचे प्रधान जुगलकिशोर लोहिया यांचे व त्यांचे सर्व सहकारी इत्यादींचे असते. हे येथील वाखण्याजोगी गोष्ट आहे. विद्यार्थ्यांवर सुसंस्कार घडवतात त्यामुळे येथुन बाहेर निघणारा विद्यार्थी निव्यर्सनी, सुसंस्कारीत व आरोग्य संपन्न अ...

जीवनविद्या मिशन' शाखा परळी च्या वतीने उत्साहात प्रवचन कार्यक्रम

इमेज
 ' जीवनविद्या मिशन' शाखा परळी च्या वतीने उत्साहात प्रवचन कार्यक्रम विचारांच्या सामर्थ्यातूनच राष्ट्रहित आणि विश्वशांती शक्य – नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी माणसाचे जीवन हे त्याच्या विचारांचे प्रतिबिंब -डॉ. सौ. प्रतिमा संखे परळी वैजनाथ (प्रतिनिधी):       विचारांचे सामर्थ्य मोठे असते. सकारात्मक आणि राष्ट्रहित जपणाऱ्या विचारांतूनच आदर्श समाज निर्माण होऊ शकतो. डॉ. सौ. प्रतिमा संखे यांचे मार्गदर्शन परळीकरांसाठी वैचारिक मेजवानी ठरले असे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. तर यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतानाव सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या शिष्या डॉ. सौ. प्रतिमा संखे यांनी माणसाचे जीवन हे त्याच्या विचारांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन केले.           परळी वैजनाथ येथील आर्यसमाज मंदिरात जीवनविद्या मिशन, मुंबई शाखा परळी वैजनाथ  यांच्या वतीने आयोजित 'विचारांचे सामर्थ्य मोठे' या विषयावरील प्रवचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. थोर समाज सुधारक सद्गुरू वामनराव पै यांच्या शिष्या आणि २०२२ च्या युपी...

Motivational story......जिद्दीने मिळवले यश

इमेज
घरची हलाखीची परिस्थिती, पितृछत्र हरपले तरी जिद्दीने मिळवले यश; दर्शन निले पालघर पोलीस दलात दाखल  घाटनांदूर | प्रतिनिधी : जीवनात कितीही संकटं आली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यावर मात करता येते, याचं उदाहरण घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथील चि. दर्शन शंकर निले याने दाखवून दिलं आहे. वडिलांचं अकाली निधन, घरची हलाखीची परिस्थिती आणि वाढलेल्या जबाबदाऱ्या अशा अडचणींमध्येही त्याने पालघर पोलीस भरतीत १३२ गुण मिळवत यश मिळवलं आहे. दर्शनचे वडील स्व. शंकर निले हे कपड्याचे छोटे व्यापारी व आईचा शिवणकाम चा व्यवसाय होता. कै.शंकर आप्पा नीले यांच्या व्यवसायावरच कुटुंब चालत होतं. मात्र, त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर मोठं संकट आलं.  आर्थिक अडचणी निर्माण झाल्या, घराचा आधारच हरपला. अशा परिस्थितीत अनेकजण खचून जातात, पण दर्शनने धीर सोडला नाही. वडिलांचं “मुलगा पोलीस व्हावा” हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार त्याने केला आणि त्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत राहिला. पोलीस भरतीची तयारी करताना त्याने स्वतःला शिस्त लावली. पहाटे उठून धावणे, मैदानी सराव, शारीरिक चाचण्यांची तयारी आणि त्यानंतर अभ्यास असा...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....