पोस्ट्स

ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने,.....मराठी पंचांगात अधिक मास का येतो, जाणून घ्या.....

इमेज
  आजपासून पुरुषोत्तम मास अर्थात ज्येष्ठ अधिक मास सुरू !        सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास (पुरुषोत्तम मास) असेल, म्हणजेच ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने राहील. 16 मे पर्यंत ज्येष्ठ कृष्ण पक्ष राहील, त्यानंतर 17 मे पासून अधिक मास सुरू होईल, जो 15 जून पर्यंत चालेल. त्यानंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष सुरू होईल, जो 29 जून पर्यंत राहील. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, जानवे संस्कार यांसारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त नसतात. अधिक मासात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजा केली जाते. या महिन्याला विष्णूंच्याच पुरुषोत्तम या नावानेही ओळखले जाते. या दिवसांमध्ये तीर्थस्नान, मंदिरांमध्ये दर्शन-पूजन, सत्संग, मंत्र जप, दान-पुण्य, पूजन इत्यादी शुभ कार्ये केली जातात. इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर असते आणि हिंदी पंचांगमध्ये अधिक मास. लीप इयरमध्ये फक्त एक दिवस वाढतो, तर अधिक मासामुळे मराठी वर्षात पूर्ण एक महिना वाढतो. खरं तर, हे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यातील फरकामुळे होते. लीप वर्षात एक दिवस वाढतो..... इंग्रजी कॅलेंडर   पृथ्वीच्...

तरुणी कडून झालेला अपमान सहन न झाल्याने जीवन संपवले...

इमेज
"हा माझा शेवटचा फोन आहे" असे वडिलांना म्हणत युवकाची गळफास लावून आत्महत्या परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... "हा माझा शेवटचा फोन आहे" वडिलांना असे म्हणत युवकाची गळफास लावून  आत्महत्या  केल्याची  एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.परळी तालुक्यातील मोहा येथे ही घटना घडली. एका तरुणीने भररस्त्यात जाहीरपणे थोबाडीत मारल्याने झालेल्या तीव्र अपमानामुळे या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेभाऊ रामभाऊ शिंदे (रा. मोहा) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा चंद्रहार राजेभाऊ शिंदे याला गावातीलच एका तरुणीने १३ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास करेवाडी रोडवरील लाल माती परिसरात सर्वांसमक्ष थोबाडीत मारले होते. या मारहाणीमुळे आणि झालेल्या जाहीर अपमानामुळे चंद्रहार अत्यंत नैराश्यात होता. हा मानसिक छळ सहन न झाल्याने त्याने १४ मे रोजी सायंकाळी आपल्या वडिलांना फोन ...

अभिष्टचिंतन लेख:::::::: हार्दिक शुभेच्छा!!!!!

इमेज
  रुग्णसेवेतून समाजसेवेचा वसा जपणारे व्यक्तिमत्त्व :डॉ. विवेक दंडे परळी वैजनाथ ही प्रभू श्री वैद्यनाथांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेली नगरी जशी श्रद्धेचे केंद्र आहे, तशीच ती आरोग्यसेवेतील विश्वासाचेही प्रतीक बनली आहे. या विश्वासाला आपल्या सेवाभावी कार्यातून बळकटी देणारे नाव म्हणजे डॉ. विवेक दंडे. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून ती समाजसेवेची पवित्र जबाबदारी आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून वेळोवेळी सिद्ध केले आहे. आज दि. १७ मे रोजी डॉ. विवेक दंडे यांचा वाढदिवस साजरा होत असून, त्यानिमित्त त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक  कार्याचा घेतलेला हा गौरवपूर्ण आढावा आहे. डॉ. विवेक दंडे यांना सेवाभावाची प्रेरणा त्यांच्या वडिलांकडूनच लाभली. स्वर्गीय डॉ. दिगंबर दंडे (दादा) हे परळीतील ज्येष्ठ, अनुभवी आणि अत्यंत आदरणीय डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आयुष्यभर रुग्णसेवेला माणुसकीची जोड दिली. त्यांचा हाच आदर्श आणि संस्कार डॉ. विवेक दंडे यांनी आपल्या जीवनात आत्मसात केला. त्यामुळे आज त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला केवळ औषधोपचारच नव्हे, तर आत्मीयतेचा आणि विश्वासाचा स...
इमेज
  20 मे रोजी देशभरातील मेडिकल स्टोअर्स राहणार बंद ? 12.4 लाख औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप परळी, प्रतिनिधी..  देशभरातील औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपात १२.४ लाखांहून अधिक औषध विक्रेते आणि औषध वितरक सहभागी होणारा असल्यामुळे परिणामी, २० मे रोजी देशाच्या अनेक भागांमध्ये औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे हा संप ऑल इंडिया केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने (AIOCD) पुकारला असून ऑनलाइन फार्मसी प्लॅटफॉर्म आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणांमुळे पारंपरिक औषध व्यवसायावर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. लाखो औषध विक्रेत्यांची संपाची हाक ही ई-फार्मसीच्या वाढत्या आणि अनियंत्रित व्यवसायाचा निषेध करण्यासाठी 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स' या संघटनेने २० मे रोजी देशव्यापी पुकारलेल्या संपात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. या दिवशी देशभरातील सर्व औषध दुकाने आणि वितरक आपली प्रतिष्ठाने बंद ठेवणार असून यामध्ये सुमारे १२.४ लाखांहून अधिक केमिस्ट आणि औषध वितरकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेने, ऑनलाइन फार्मसीच्या अनिय...

प्रमाणपत्र रोखण्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार जरांगेंचे टीकास्त्र...

इमेज
राज्यात मराठ्यांचा पुन्हा एल्गार: मनोज जरांगेचे 30 मे पासून उपोषण मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे वादळ घोंगावणार असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाची वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप करत, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आरक्षणाचा हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला पुन्हा एकदा एकवटण्याचे आवाहन केले आहे. प्रमुख मागण्याया आंदोलनामध्ये प्रामुख्याने खालील तीन मागण्या सरकारसमोर ठेवण्यात आल्या आहेत:कुणबी प्रमाणपत्र वाटप: मराठवाड्यातील मराठा समाजाला विनाविलंब कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात यावे.५८ लाख बांधवांना लाभ: ज्या ५८ लाख मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना त्वरित प्रमाणपत्रे देण्यात यावीत.सातारा गॅझेटची अंमलबजावणी: ऐतिहासिक सातारा गॅझेटचा जीआर (शासकीय निर्णय) तातडीने लागू करावा. याव्यतिरिक्त, सध्या अस्तित्त्वात असलेली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून, मरा...

क्रीडाविषयक प्रोत्साहन.....

इमेज
  अंबाजोगाई क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सोहम गजाकोशचा दबदबा डॉ.अतुल शिंदे यांच्या हस्ते सोहमला आरसीबी खेळाडू देवदत्त पड्डिक्कल यांच्या सहीचा बॉल प्रदान अंबाजोगाई : (प्रतिनिधी)अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट टूर्नामेंटमध्ये युवा गोलंदाज सोहम गजाकोश याने आपल्या अचूक आणि धारदार गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण स्पर्धेत विशेष छाप पाडली. स्पर्धेदरम्यान प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवत सोहमने तब्बल 13 फलंदाजांना बाद केले आणि “बेस्ट बॉलर” किताबावर आपले नाव कोरले. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे मैदानावर उपस्थित क्रिकेटप्रेमींनी त्याचे जोरदार कौतुक केले. संपूर्ण स्पर्धेत सोहमने टाकलेल्या माऱ्यासमोर अनेक फलंदाज निष्प्रभ ठरले. योग्य टप्प्यावर गोलंदाजी, उत्कृष्ट लाईन-लेंथ आणि दबावाच्या क्षणी विकेट घेण्याची क्षमता यामुळे तो स्पर्धेतील सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. प्रत्येक सामन्यात त्याने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. या स्पर्धेसाठी “बेस्ट बॉलर” पारितोषिक देण्याची घोषणा सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ् डॉ. अतुल शिंदे यांनी केली होती. स्पर्धेच्...
इमेज
अंबाजोगाई बसस्थानकावर महिलेच्या पर्समधील सोन्याचे साडेचार लाखांचे दागिने लंपास अंबाजोगाई (प्रतिनिधी):-    सध्या उन्हाळी सुट्यांमुळे अंबाजोगाई बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होत आहे . बसस्थानकावरील याच प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या बॅगेतील ४ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी वैजनाथ येथील रहिवासी मनिषा विनोद जगतकर (वय ५०) या बुधवारी सकाळी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी मुरुड (जि. लातूर) येथे जाण्यास निघाल्या होत्या. त्या परळीहून अंबाजोगाई बस स्थानकावर आल्या होत्या.  येथून पुढे जाण्यासाठी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई येथून मुरुड  जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. बसमध्ये मोठी गर्दी असल्यामुळे  जागा पकडण्यासाठी त्यांचे दीर आप्पाराव कांबळे यांनी दागिन्यांची बॅग कंडक्टरच्या सीटजवळ...

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या