ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने,.....मराठी पंचांगात अधिक मास का येतो, जाणून घ्या.....

इमेज
  आजपासून पुरुषोत्तम मास अर्थात ज्येष्ठ अधिक मास सुरू !        सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास (पुरुषोत्तम मास) असेल, म्हणजेच ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने राहील. 16 मे पर्यंत ज्येष्ठ कृष्ण पक्ष राहील, त्यानंतर 17 मे पासून अधिक मास सुरू होईल, जो 15 जून पर्यंत चालेल. त्यानंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष सुरू होईल, जो 29 जून पर्यंत राहील. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, जानवे संस्कार यांसारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त नसतात. अधिक मासात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजा केली जाते. या महिन्याला विष्णूंच्याच पुरुषोत्तम या नावानेही ओळखले जाते. या दिवसांमध्ये तीर्थस्नान, मंदिरांमध्ये दर्शन-पूजन, सत्संग, मंत्र जप, दान-पुण्य, पूजन इत्यादी शुभ कार्ये केली जातात. इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर असते आणि हिंदी पंचांगमध्ये अधिक मास. लीप इयरमध्ये फक्त एक दिवस वाढतो, तर अधिक मासामुळे मराठी वर्षात पूर्ण एक महिना वाढतो. खरं तर, हे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यातील फरकामुळे होते. लीप वर्षात एक दिवस वाढतो..... इंग्रजी कॅलेंडर   पृथ्वीच्...

 20 मे रोजी देशभरातील मेडिकल स्टोअर्स राहणार बंद ? 12.4 लाख औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप




परळी, प्रतिनिधी..

 देशभरातील औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपात १२.४ लाखांहून अधिक औषध विक्रेते आणि औषध वितरक सहभागी होणारा असल्यामुळे परिणामी, २० मे रोजी देशाच्या अनेक भागांमध्ये औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहे हा संप ऑल इंडिया केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने (AIOCD) पुकारला असून ऑनलाइन फार्मसी प्लॅटफॉर्म आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या धोरणांमुळे पारंपरिक औषध व्यवसायावर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

लाखो औषध विक्रेत्यांची संपाची हाक ही ई-फार्मसीच्या वाढत्या आणि अनियंत्रित व्यवसायाचा निषेध करण्यासाठी 'ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स' या संघटनेने २० मे रोजी देशव्यापी पुकारलेल्या संपात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. या दिवशी देशभरातील सर्व औषध दुकाने आणि वितरक आपली प्रतिष्ठाने बंद ठेवणार असून यामध्ये सुमारे १२.४ लाखांहून अधिक केमिस्ट आणि औषध वितरकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेने, ऑनलाइन फार्मसीच्या अनियंत्रित कामकाजामुळे लहान औषध विक्रेत्यांच्या अस्तित्वासमोर गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा करत या संपाच्या माध्यमातून औषध विक्रेते आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधणार असून, या देशव्यापी बंदमुळे औषध पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बनावट आणि निकृष्ट औषधांच्या धोक्यावरून पुकारलेला हा लढा असूनदेशातील रुग्णांना बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचा वाढता धोका लक्षात घेता, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं २० मे रोजी देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. या हाकेला प्रतिसाद देत परळी ड्रग असोसिएशनच्या वतीने देशव्यापी बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला असून या बंदमध्ये औषधी पुरवठादार व विक्रेते यांनी सहभागी व्हावे असे परळी ट्रक असोसिएशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या