ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने,.....मराठी पंचांगात अधिक मास का येतो, जाणून घ्या.....

इमेज
  आजपासून पुरुषोत्तम मास अर्थात ज्येष्ठ अधिक मास सुरू !        सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास (पुरुषोत्तम मास) असेल, म्हणजेच ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने राहील. 16 मे पर्यंत ज्येष्ठ कृष्ण पक्ष राहील, त्यानंतर 17 मे पासून अधिक मास सुरू होईल, जो 15 जून पर्यंत चालेल. त्यानंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष सुरू होईल, जो 29 जून पर्यंत राहील. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, जानवे संस्कार यांसारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त नसतात. अधिक मासात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजा केली जाते. या महिन्याला विष्णूंच्याच पुरुषोत्तम या नावानेही ओळखले जाते. या दिवसांमध्ये तीर्थस्नान, मंदिरांमध्ये दर्शन-पूजन, सत्संग, मंत्र जप, दान-पुण्य, पूजन इत्यादी शुभ कार्ये केली जातात. इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर असते आणि हिंदी पंचांगमध्ये अधिक मास. लीप इयरमध्ये फक्त एक दिवस वाढतो, तर अधिक मासामुळे मराठी वर्षात पूर्ण एक महिना वाढतो. खरं तर, हे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यातील फरकामुळे होते. लीप वर्षात एक दिवस वाढतो..... इंग्रजी कॅलेंडर   पृथ्वीच्...

अभिष्टचिंतन लेख:::::::: हार्दिक शुभेच्छा!!!!!

 रुग्णसेवेतून समाजसेवेचा वसा जपणारे व्यक्तिमत्त्व :डॉ. विवेक दंडे

परळी वैजनाथ ही प्रभू श्री वैद्यनाथांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेली नगरी जशी श्रद्धेचे केंद्र आहे, तशीच ती आरोग्यसेवेतील विश्वासाचेही प्रतीक बनली आहे. या विश्वासाला आपल्या सेवाभावी कार्यातून बळकटी देणारे नाव म्हणजे डॉ. विवेक दंडे. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून ती समाजसेवेची पवित्र जबाबदारी आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून वेळोवेळी सिद्ध केले आहे.

आज दि. १७ मे रोजी डॉ. विवेक दंडे यांचा वाढदिवस साजरा होत असून, त्यानिमित्त त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक  कार्याचा घेतलेला हा गौरवपूर्ण आढावा आहे.

डॉ. विवेक दंडे यांना सेवाभावाची प्रेरणा त्यांच्या वडिलांकडूनच लाभली. स्वर्गीय डॉ. दिगंबर दंडे (दादा) हे परळीतील ज्येष्ठ, अनुभवी आणि अत्यंत आदरणीय डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आयुष्यभर रुग्णसेवेला माणुसकीची जोड दिली. त्यांचा हाच आदर्श आणि संस्कार डॉ. विवेक दंडे यांनी आपल्या जीवनात आत्मसात केला. त्यामुळे आज त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला केवळ औषधोपचारच नव्हे, तर आत्मीयतेचा आणि विश्वासाचा स्पर्श अनुभवायला मिळतो.

आरोग्यसेवेबरोबरच सामाजिक व आर्थिक क्षेत्रातही त्यांनी आपले योगदान प्रभावीपणे नोंदवले आहे. दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्य करताना त्यांनी सामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणारी भूमिका कायम ठेवली आहे. समाजाशी असलेली त्यांची बांधिलकी आणि संवेदनशील दृष्टिकोन यामुळे ते बँकिंग क्षेत्रातही आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जातात.

डॉ. विवेक दंडे यांचे संपूर्ण कुटुंबच समाजसेवेच्या मूल्यांनी प्रेरित आहे. त्यांचे कनिष्ठ बंधू प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. तेजस दंडे हे मुंबई उच्च न्यायालयात यशस्वी वकील म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य आणि न्याय या समाजजीवनातील दोन महत्त्वाच्या क्षेत्रांतून सेवा देणारे हे कुटुंब म्हणजे संस्कार, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरते.

कोरोना महामारीच्या कठीण काळात, जेव्हा संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली होते, त्या वेळी डॉ. विवेक दंडे यांनी आपल्या रुग्णसेवेचा धागा कधीही तुटू दिला नाही. अत्यल्प साधनसामग्रीतही त्यांनी अनेक रुग्णांना दिलासा दिला, धीर दिला आणि जीवनासाठी लढण्याचे बळ दिले. त्यांच्या या समर्पित सेवेमुळे त्यांनी परळीच्या वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रुग्णालयातील सेवेसोबतच त्यांनी विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि सामाजिक उपक्रम राबवून समाजाच्या आरोग्याची व्यापक जबाबदारीही स्वीकारली आहे. वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग केवळ उपचारापुरता न ठेवता जनहितासाठी कसा करायचा, याचे ते उत्तम उदाहरण आहेत.

डॉ. विवेक दंडे हे केवळ यशस्वी डॉक्टर नाहीत, तर संवेदनशील समाजसेवक, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करताना, परळी वैजनाथ नगरीसाठी त्यांनी दिलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त करावी लागेल.

— संतोष जुजगर,परळी वैजनाथ

मो. ९८६०८८६७३७





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या