पोस्ट्स

आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा रंगणार जल्लोष...

इमेज
  सिरसाळा येथे बुद्धरूप अनावरण व बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्याचे आयोजन ना. संजय शिरसाट,ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री  आ.धनंजय मुंडे व डॉ. हर्षवर्धन कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम परळी प्रतिनिधी - परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रविवार दि. २४ मे २०२६ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या बुद्धरूपाचे अनावरण तसेच सम्राट अशोक बुद्ध विहाराच्या लोकार्पणाचा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवानिमित्त परिसरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले असून पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. सम्राट अशोक बुद्ध विहार, कुशी नगर, सिरसाळा येथे होणाऱ्या या कार्यक्रमास विविध मान्यवर, भन्तेजी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी सर्व नागरिकांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून होणार असून पूज्य भन्ते डॉ. धम्मप्रिय महास्थवीर (अध्यक्ष, भीम जन्मभूमी महू, मध्यप्रदेश) यांच्या हस्ते हा विधी पार पडणा...

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

इमेज
  पिसाळलेल्या आणि धोकादायक कुत्र्यांना दयामरण देण्यास मंजुरी; भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय नवी दिल्ली येथे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय दिला. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने मानवी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, पिसाळलेल्या, अत्यंत आक्रमक आणि कधीही बऱ्या न होणाऱ्या आजाराने ग्रस्त कुत्र्यांना कायदेशीर चौकटीत दयामरण देण्यास मंजुरी दिली आहे. प्राण्यांच्या जन्म नियंत्रण नियमांचे पालन करून आणि तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या तपासणीनंतरच ही कारवाई केली जाईल. न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शाळा, रुग्णालये आणि रेल्वे स्थानके यांसारख्या सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना त्वरित हटवून निवारा केंद्रात हलवण्याचे आदेश दिले आहेत. तेथे त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करणे बंधनकारक असेल. सार्वजनिक आरोग्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचे आणि शासकीय रुग्णालयांमध्ये रेबीज प्रतिबंधक लस पुरेशा प्रमा...

उद्या होणाऱ्या नियोजन बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन

इमेज
  काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे २८ मे रोजी परळीत आगमन उद्या होणाऱ्या नियोजन बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन परळी वैजनाथ | संतोष जुजगर  परळी वैद्यनाथ नगरीच्या पावन भूमीत गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी काशी जगद्गुरु श्री. १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे भव्य आगमन होणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकमासानिमित्त आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बुधवार दिनांक २० मे २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता बेलवाडी येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस श्री ष.ब्र. १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर उपस्थित राहणार आहेत. तरी या महत्त्वपूर्ण नियोजन बैठकीस व आगामी धार्मिक कार्यक्रमास सर्व वीरशैव लिंगायत समाजातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त वीरशैव लिंगायत समाज, परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्त्वाची व्यावसायिक संधी :

इमेज
महत्त्वाची व्यावसायिक संधी : परळी वैजनाथ नगर परिषदेकडून व्यापारी संकुलातील दुकानांचा ई- लिलाव जाहीर ; २७ दुकाने उपलब्ध परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         परळी वैजनाथ नगर परिषदेकडून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाजवळ उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील दुकानांच्या सार्वजनिक ई-लिलावाची घोषणा करण्यात आलेली आहे. शहरातील व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी  सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, या ठिकाणी २७ दुकाने उपलब्ध आहेत.इच्छुक व्यापाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविता येणार आहे.           नगर परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपल्या आवडीच्या दुकानाची पाहणी करून नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या अधिकृत www.mahatenders.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तसेच डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, शॉप अ‍ॅक्ट परवाना अथवा उद्योग प्रमाणपत्र आणि नगरपालिकेचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची...
इमेज
 राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोरांची शिकार; चार शिकारी ताब्यात  राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची शिकार करणार्‍या चार जणांना मध्यरात्री ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील मांडवखेल परिसरात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वन्यजीव प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही संशयित व्यक्ती मोरांची शिकार करण्यासाठी मांडवखेल परिसरात आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा चार जण मोरांची शिकार करत असल्याचे उघड झाले. ग्रामस्थांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले आणि वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळावरून शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य तसेच मृत मोर जप्त करण्यात आले. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित चारही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राष्ट्रीय पक्ष्याची शिकार केल्याने आरोपींवर कठोर कारवा...
इमेज
  बाळासाहेब दोडतले यांना मातृशोक; कमलबाई दोडतले यांचे निधन अंबाजोगाई: पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले यांच्या मातोश्री कमलबाई प्रभाकर दोडतले यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे दोडतले कुटुंबावर आणि चतुरवाडी परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे.  दिवंगत कमलबाई दोडतले यांच्या पार्थिवावर आज, १९ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता अंबाजोगाई तालुक्यातील चतुरवाडी येथील त्यांच्या खाजगी शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुःखद प्रसंगी अंबाजोगाई आणि परिसरातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दोडतले कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
इमेज
भूलतज्ज्ञ डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू अंबाजोगाई (प्रतिनिधी) -  येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे  भूलशास्त्र (एनॅस्थेशिया) विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा आज सकाळी काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. डॉ तरकसे हे नियमितपणे पोहणाऱ्या पैकीच एक होते मात्र तरीही त्यांचा पोहतांना बुडून मृत्यू झाल्याने हळहळ होत आहे. सदरील घटना ही आज सकाळी ६:३० च्या सुमारास ही उघडकीस आली आहे. या वृत्तामुळे संपूर्ण अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून, डॉ. तरकसे यांच्या चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी  काळवटी तलावाकडे धाव घेतली.            डॉ. अभिमन्यू तरकसे हे प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनियमाणे अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काळवीट साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहण्यासाठी तलावात उतरले. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या कमरेला बिसलरीची रिकामी बाटलीही बांधली होती. मात्र, ...

शिवभक्तांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ.धनंजय मुंडे यांचे आभार!!!!!

इमेज
  श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिसर विकासासाठी ३०१.५४ कोटींची तरतुद धनंजय मुंडेंनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मुंबई (प्रतिनिधी) - पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर व परिसराच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास सुधारित ३०१.५४ कोटी रुपयांची मान्यता आज संपन्न झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्य सरकारने दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत अधिकृतपणे हे जाहीर केले आहे. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.  विशेष म्हणजे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार हयात असताना धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियोजन विभागाकडे वर्ग करून नियोजन विभागामार्फत राबवण्याची मागणी केली होती, त्या मागणीसही शिखर समितीने मंजुरी दिली असून, आता श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखडा नियोजन विभागाकडून राबवण्यात येणार आहे.  या बैठकीत धनंजय मुंडे यांनी सध्या सुरू असलेल्या व आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या विविध...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या