उद्या होणाऱ्या नियोजन बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन

 काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे २८ मे रोजी परळीत आगमन



उद्या होणाऱ्या नियोजन बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी वैजनाथ | संतोष जुजगर 

परळी वैद्यनाथ नगरीच्या पावन भूमीत गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी काशी जगद्गुरु श्री. १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे भव्य आगमन होणार असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकमासानिमित्त आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बुधवार दिनांक २० मे २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता बेलवाडी येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस श्री ष.ब्र. १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर उपस्थित राहणार आहेत.

तरी या महत्त्वपूर्ण नियोजन बैठकीस व आगामी धार्मिक कार्यक्रमास सर्व वीरशैव लिंगायत समाजातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त वीरशैव लिंगायत समाज, परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!