प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

MB NEWS-सोमवार पासून अखंड शिवनाम सप्ताह व श्री.ग्रंथराज परमरह्स पारायण सोहळ्यास सुरुवात

 परळीत शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

सोमवार पासून अखंड शिवनाम सप्ताह व श्री.ग्रंथराज परमरह्स पारायण सोहळ्यास सुरुवात


परळी वैजनाथ ता.२१ (बातमीदार)

             येथील शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त गेल्या ४० वर्षापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही अखंड शिवनाम सप्ताह व शनैश्वर जन्मोत्सव २३ ते २९ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

         येथे दरवर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या उपस्थितीत अखंड शिवनाम सप्ताह श्री.ग्रंथराज परमरस्य पारायण सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात सोमवार (ता.२३) ते सोमवार (ता.३०) पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी (ता.२९) संध्याकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी शनैश्वर जन्मोत्सव साजरा होईल यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षी हा महाप्रसाद याच शनिमंदिर मध्ये होणार आहे.  त्याचबरोबर शुक्रवारी (ता.२७) भव्य रक्तदान शिबीर सकाळी आठ ते बारा यावेळेत आयोजित केले आहे.अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रक्तपेढी यासाठी सहकार्य करणार आहे. रोज सकाळी शिवपाठ, परमरस्य पारायण, शनि महात्म्य पारायण, गाथा भजन, प्रवचन आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.  दरम्यान शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने शनिमंदिर जिर्णोद्धार सुरू करण्यात आला आहे.जवळपास चार कोटी रुपये खर्च करुन मंदिराची नियोजित वास्तू उभी राहत आहे.यामध्ये भाविकांसाठी भव्य असे भक्त निवास,मंदिराची वास्तू उभी राहत आहे. या मंदिराचे बरेचसे काम पुर्ण होत आले आहे. तरी भाविक भक्तांनी या जिर्णोद्धारास आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

• 

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या