अण्णाभाऊ साठे जयंती

 आजच्या समाजाला थोर महापुरुषांचे विचार प्रेरणादायी -प्राचार्य डॉ आर. डी. राठोड    

 परळी वैजनाथ,  प्रतिनिधी....

          जवाहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर डी राठोड यांनी अशा थोर महापुरुषांचे विचार आजच्या समाजाला प्रेरणादायी आहेत असे मत व्यक्त केले. 

     साहित्यकार अण्णाभाऊ साठे यांनी वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित समाजाला लेखणीच्या माध्यमातून दिशा देण्याचे कार्य केले. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी आपले प्रखर विचार राष्ट्रवादी दृष्टिकोनातून मांडनीं केली. तसेच लोकमान्य टिळकांनी चतुसूत्री च्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या विरोधात आक्रमक पावले उचलली होती असेही मत याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दिलीप गायकवाड यांनी केले. तर आभार डॉ बी के शेप यांनी मानले. या कार्यक्रमाला  महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरिश मुंडे, डॉ.बा आं.म विद्यापीठ परिषदेचे सदस्य,डॉ पी एल कराड, कार्यालयीन प्रमुख अशोक रोडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार