इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

परळी वैजनाथ

बीड जिल्ह्यच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या अमृत भारत  योजनेअंतर्गत परळी वैजनाथ रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास होणार आहे. रविवार, 6 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या कामाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने साऊथ सेंट्रल रेल्वेचे अपर मंडळ प्रबंधक राजीव कुमार गंगेले यांची भेट घेतली.

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील अनेक रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. सदरील योजनेत परळी वैजनाथ रेल्वेस्थानकाचा समावेश करावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे खा. प्रीतमताई मुंडे यांनी सतत पाठपुरावा केला. या योजनेत आता परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. रविवार 6 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारी साठी बुधवार दि 2 ऑगस्ट रोजी भाजपा तालुका अध्यक्ष सतीश मुंडे, शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टे,  स्वीय्य सहाय्यक राजेंद्र लोढा यांनी साऊथ सेंट्रल रेल्वेचे अपर मंडळ प्रबंधक राजीव कुमार गंगेले यांची भेट घेतली. या भेटीत चर्चा करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. 

रेल्वेस्थानकांचा पायाभूत विकास करण्यावर या योजनेत भर देण्यात आला आहे. त्यासाठी दीर्घकालीन विकास आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. स्थानकांचा विकास करताना दररोज स्थानकावर येणारी सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेवून नियोजन करण्यात आले आहे. एकंदरीत प्रवासी केंद्रीत सुविधा स्थानकांवर विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. स्थानकाच्या बाह्यरूपासोबतच अंतर्गत भागातही सुधारणा करण्याची तरतूद या योजनेत असणार आहे.

या उदघाटन कार्यक्रमाच्या तयारीसाठी विशेष रेल्वेने साऊथ सेंट्रल रेल्वेचे अपर मंडळ प्रबंधक राजीव कुमार गंगेले परळी येथे आले होते. यावेळी चर्चा करण्यासाठी भाजपा तालुका अध्यक्ष सतीश मुंडे, शहर अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टे, खा. प्रीतमताई मुंडे यांचे स्वीय्य सहाय्यक राजेंद्र लोढा उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या