मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

या 21 मंडळांमधील अग्रीमला मान्यता

 धनंजय मुंडे यांच्या सूचनेनंतर सोयाबीन अग्रीम साठी आधीच्या 52 नंतर आता आणखी 21 मंडळांचा समावेश

एकूण 86 पैकी 73 मंडळांमध्ये सोयाबीन अग्रीम पिक विम्यास मान्यता तर उर्वरित 13 मंडळाच्या बाबतीत अहवाल पूर्ण झाल्यानंतर सोमवारी निर्णय होण्याची शक्यता


बीड (दि. 05) - राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा प्रशासनास दिलेल्या सूचनांप्रमाणे अग्रीम पिक विमा देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. या कार्यवाहीस आता वेग आला असून सोयाबीन पिकाच्या आधी मंजूर केलेल्या 52 मंडळांसह अग्रीम पीक विमा देण्यासाठी आणखी 21 मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.


एकूण 86 मंडळांपैकी 52 मंडळांमध्ये सर्वेक्षणाचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर अग्रीम पिक विमा मंजूर करण्याची अधिसूचना मागील आठवड्यात काढण्यात आली होती, त्यानंतर चार तारखेपर्यंत पूर्ण झालेल्या सर्वेक्षणाचे अहवाल तपासून जिल्हा प्रशासनाने आज जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आणखी 21 मंडळांमध्ये सोयाबीन या पिकाच्या अग्रीम पीक विम्यास मंजुरी दिली आहे. 


आता 86 पैकी 73 मंडळांमध्ये सोयाबीन या पिकास अग्रीम पिक विमा मिळण्याचे निश्चित झाले असून उर्वरित 13 मंडळाचे सर्वेक्षण अजूनही सुरू आहे. हे सर्वेक्षण व कृषी विद्यापीठातील हवामान तज्ञ व कृषी विद्यावेत्ता यांना 13 मंडळांचा अहवाल व उपग्रहानुसारची माहीची (satellite data) अहवाल रविवार पर्यंत सादर करण्याचा सूचना आहेत, त्यानुसार सदर अहवाल रविवार पर्यंत येतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील सोमवारी उर्वरित 13 मंडळांचा समावेश करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कापूस व तूर या दोन पिकांच्या अग्रीम बाबत देखील सोमवारच्या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली आहे.


या 21 मंडळांमधील अग्रीमला मान्यता


धारूर तालुका - धारूर, अंजनडोह, तेलगाव, मोहखेड

गेवराई तालुका - पाचेगाव, पाडळसिंगी, धोंडराई

परळी - परळी

केज - होळ, केज, चिंचोली माळी, हनुमंत पिं., मसाजोग, युसूफ वडगाव, बनसारोळा

पाटोदा - अमळनेर, कुसळंब, पाटोदा, थेरला, दासखेड, 

वडवणी - चिंचवण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....