निवड:सत्कार:अभिनंदन

 प्रोफेसर पदी निवड झाल्याबद्दल पत्रकारांच्या वतीने प्रा.माधव रोडे यांचा सत्कार


परळी प्रतिनिधी.     येथील वैद्यनाथ महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. माधव रोडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर यांनी नुकतीच प्रोफेसर पदी निवड केल्याबद्दल परळी शहरातील पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

     प्रा. डॉ. माधव रोडे हे वैद्यनाथ महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख आहेत. तसेच ते वैद्यनाथ महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. नुकतीच त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रोफेसर पदावर नियुक्ती केली आहे. याबद्दल परळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, मोहन व्हावळे, संभाजी मुंडे, दत्ता काळे, प्रा.दशरथ रोडे,धीरज जंगले, विकास वाघमारे आदिंनी त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राध्यापक आंधळे सर, मनसेचे शहर उपाध्यक्ष विठ्ठलराव झिलमेवाड उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!