इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

साहित्यिक भालचंद्र नेमाडेंचा जाहीर निषेध

 प्रसिद्धीसाठी रामाच्या अस्तित्वावर वादग्रस्त वक्तव्य करून, ज्ञानाचे  पिठ दळणारे डॉ.भालचंद्र नेमाडे चा तीव्र निषेध



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)केवळ प्रसिद्धीसाठी भगवान  श्रीरामाच्या अस्तित्वावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या डॉ भालचंद्र नेमाडे यांचा जाहीर तीव्र निषेध संत वाड्:मयाचे संशोधक ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केला आहे.


मोठे साहित्यक म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असलेले नेमाडे सर यांनी केवळ प्रसिद्धीसाठी रामाच्या अस्तित्वावर सत्य असत्याची गोष्ट करीत वाल्मिकीचे  रामायणातील राम खरा कशावरून असे वक्तव्य केले. 


  स्वतः च्या ज्ञानाचे व बुद्धी चे पिठ दळणाऱ्या  नेमाडें चा जाहिर निषेध ॲड आंधळे महाराज यांनी केला आहे.

टिप्पण्या

  1. अरे त्य वेळी तुम्ही होता का ते सांगा तुम्हाला प्रभु श्रीराम माहीत आहेत का तुमे हिंदू धर्मात आहेत असे वाटत नाही

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या