युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

भरवस्तीत जेष्ठ साहित्यिकाची मोटारसायकल टाकली जाळून

 भरवस्तीत जेष्ठ साहित्यिकाची मोटारसायकल टाकली जाळून


अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घराच्या पोर्चमध्ये घुसून अज्ञात व्यक्तीने पेट्रोलचे बोळे टाकून एका जेष्ठ साहित्यिकाची मोटारसायकल जाळली आहे. हा प्रकार शहरातील भरवस्तीत दीनदयाळ कॉलनीत रविवारी पहाटे घडला.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, येथील दीनदयाळ कॉलनीत ज्येष्ठ साहित्यिक, शिक्षक दिनकर वासुदेवराव जोशी राहतात. अज्ञात व्यक्तीने रविवारी पहाटे पेट्रोलचे बोळे टाकून जोशी यांची मोटारसायकल पेटवून दिली आणि तो व्यक्ती पळून गेला. या आगीत एमएच 44, व्ही, 8632 या क्रमांकाची ड्रीम न्युयो होंडा कंपनीची मोटारसायकल जळून खाक झाली. 

या घटनेत जोशी यांचे अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दिनकर जोशी यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करित आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या